मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 12 मार्च 2024
नांदेड जिल्ह्यातील जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालया अंतर्गत तालुका कृषि अधिकारी विजयप्रकाश रमणदास चन्ना सर यांची जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी वर्धा येथे कृषि उपसंचालक पदी पदोन्नती मिळाली आहे. प्रदिर्घ काळ तालुका कृषि अधिकारी पदाचा अनुभव पाहता आणि अत्यंत कुशल प्रशासक म्हणून कामकाजाचा अनुभव असणारे म्हणून चन्ना सर यांच्याकडे बघितले जाते. महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाने दि.11 मार्च 2024 रोजच्या आदेशान्वये कृषि उपसंचालक पदोन्नती निवड झाल्याचा आदेश काढला आहे.
चन्ना सर यांच्या निवडीचे हदगाव- हिमायतनगर तालुक्याचे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगांकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी ब-हाटे सर, उपविभागीय कृषि अधिकारी रणवीर सर, नवनिर्वाचित कार्याध्यक्ष सुभाष राठोड,सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष परमेश्वर गोपतवाड, तालुका कृषि अधिकारी दिलीप जाधव सर, कृषि पर्यवेक्षक एम. एस. काळे साहेब, वानखेडे साहेब, पिंपरखेड साहेब,सुदेवाड साहेब, आडे, पैलवाड, माझळकर, लोसरवार, माने, कोटुलवार, लोखंडे, ढगे मॅडम, अक्कलवाड, घुमणवाड, ढेमकेवाड, प्रशांत पाटील आदी कृषि विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी चन्ना सरांचे अभिनंदन केले आहे.