बाबा तुम्ही जन्मले नसते तर ।
कुठे तरी खितपत पडलो असतो॥
गुलामीच्या बंधनात अडकूण
जीवनभर आम्ही सारे सडलो असतो॥
तुम्ही जन्माला आलात अन्
गुलामीची श्रृखंला ती तोडली॥
वर्ण व्यवस्थेची इथल्या तुम्हीच
उतरंड बुद्धीमत्तेने फोडली॥
आज मुका ही बोलू लागला ।
आणि पाहू लागला आज अंध॥
रुढी परंपरेचे चालत आलेले ।
तुम्हीच तोडून टाकले सर्व बंध॥ .
मानवतेची खरी शिकवण तुमची ।
अथांग सागराएवढे तुमचे ज्ञान॥
केले उपकार या देशावर तुम्ही ।
लिहून सर्व समावेशक संविधान॥
तुमच्या मूळे बाबा आज मी ।
खातो रोज रोज सुखाचा घास॥’
स्वंतत्र भारतातील मी भारतीय ।
आज मोकळा घेत आहो श्वास॥
धन्य भिमाईचा एकमेव लाल ।
धन्य धन्य रामजी नंदना॥
कवि किशोराची तुम्हास आज ।
मनापासून चरणी वंदना॥
कवि – किशोर अवचार वाडेगांवकर ता बाळापूर जि . अकोला