मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 24 नोव्हेंबर 2024
हदगांव- हिमायतनगर विधानसभा निवडणुकीच्या रींगणात चोविस उमेदवार होते. परंतु काॅग्रेसचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर आणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांच्यातच खरी लढत झाली आहे. यामध्ये नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम यांनी अतिशय नियोजन बदध प्रचारयंत्रना राबवित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने केलेल्या विविध विकास कामांचा लेखाजोखा मतदारांना पटवुन सांगितला. त्यामध्ये लाडकी बहिण, सुकन्या योजना, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कौशल्य विकास कार्यक्रम अशा विविध योजनांची माहिती सांगत. दोन वेळा विधानसभा आणी एकवेळा 2024ची लोकसभा पराभुत झालेल्या बाबुराव कदम कोहळीकर यांनी न खचता हदगाव-हिमायतनगर विधानसभा जिंकली आहे. अतिशय शांत, संयमी असलेले नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांचा कार्यक्रर्ते आणी चाहत्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करीत विविध ठिकाणी फटाक्याची आतिषबाजी करत त्यांचा सत्कार करण्यात येत आहे.