मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 07 फेब्रुवारी 2025
हिमायतनगर येथील महाराष्ट्र सुवर्ण जयंती पाणी पुरवठा योजने अंतर्गत 2019 साली सुरु झालेल्या योजनेचा शेवट 2025 वर्ष उजाडले तरी पुर्णत्वास जात नाही हि खरी शोकांतिका आहे. हिमायतनगर शहरात आज रोजी पाणीटंचाई असुन, त्याकडे कोणत्याही लोकप्रतिनीधीचे लक्ष नाही. हेही वास्तव आहे. याच प्रश्नाकडे शासनाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी शहरातील एका शिष्टमंडळाने उपोषणाला बसण्याचे निवेदन नगरपंचायत येथे देण्यात आले आहे. सहा वर्षापुर्वी सुरु झालेली हि योजना पुर्ण न झाल्यामुळे जनतेचे पाण्यावाचुन प्रचंड हाल होत आहेत. पिण्याच्या पाण्यासहित सांडपाण्याचे पाणी सुध्दा मिळत नाही. यापुर्वी उपोषणाचा इशारा देऊन सुध्दा २४ महिन्याच्या कालावधीत पुर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्या आश्वासनाची पुर्तता संबधित गुत्तेदाराने केली नाही. या योजनेसाठी केंद्र शासन, राज्य शासन आणी नगरपंचायत अशा पध्दतिने हि योजना १९.१९ कोटी रुपयांचे असल्याने आजपर्यंत गुत्तेदारांने १५.२८ कोटी रूपयांचे बिल उचलण्याचे निवेदनात म्हटले आहे. मागील तिस ते चाळीस वर्षापासुन हिमायतनगर शहराची समस्या आजतागायत कायम आहे. संबंधित या योजनेचे काम पुर्ण होऊन २०/०२/२०२५ प्रयंत नळाला पाणी न आल्यास २५/०२/२०२५ रोजी नगरपंचायत हिमायतनगर येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा नगरपंचायतीचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन शिष्टमंडळाने दिला आहे. या निवेदनावर शेख हनिफ, जफर मोहंमद खान नजर मोहमद खान, बाबाराव संभाजी शिंदे, काॅ. दिगांबर काळे आदीच्या सह्या आहेत. निवेदनाच्या प्रति पाणी पुरवठामंत्री महाराष्ट्र राज्य मुब ई, आयुक्त तथा संचालक नगरपंचायत प्रशासन मुंबई, जिल्हाधिकारी नांदेड, खासदार, आमदार, तहसिलदार हिमायतनगर, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन हिमायतनगर वरील सर्वांना निवेदन देण्यात येणार आहे.