हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्युज मो. नंबर – 8983319070
तारवाला नगर मेरी परिसर या भागात असलेला मंगल मूर्ती हास्य क्लबच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त हास्य दिंडीचे आयोजन करण्यात आले होते
या दिंडीमध्ये प्रभागाचे नगरसेवक श्री जगदीश भाऊ पाटील सहभागी झाले होते सकाळी सात वाजता जिजाऊ क्रीडा नगरी मधून सुरू झालेल्या या हास्य दिंडीमध्ये महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते ,हास्य सदस्यांनी हसा हसा खूप हसा, मोकळ्या होतील नासा नसा, नको औषध नको गोळ्या ,हसत हसत वाजवा टाळ्या, वन टू थ्री लाफिंग इज द फ्री आदी घोषणांनी परिसर दुमदुमला होता. हास्यदिंडी तारवाला नगर मधील शिवनगर, तलाठी कॉलनी, लामखेडे मळा, आनंदनगर आदी भागातून निघाली समारोप उमानगर येथील महादेव मंदिरात करण्यात आला हास्ययोग समितीच्या उपाध्यक्ष सौ जयश्री गावित, पंचवटी विभाग संपर्कप्रमुख सौ छाया थोरात, संस्थापक अध्यक्ष स्मिताताई माशाळकर अध्यक्ष अरुण गायकवाड उपाध्यक्ष शेखर ढेपे , श्रीमती सुनंदा पगार, सौ.मिनल पाटील,सचिव राजेंद्र बधान उपसचिव अनिता ढालकरी सह खजिनदार कल्पनाताई बारड , इंदुमती ताई गायकवाड, मोहनलालजी पटेल बैरागीताई युवराज थोरात, प्रमिला परदेशी, सौ पेंढारकर आदी सहभागी झाले होते.
परिसरामध्ये नागरिकांनी हास्य दिंडीवर पुष्पवृष्टी केली व हास्यदिंडीचे स्वागत केल.
हास्य दिंडी यशस्वीतेसाठी नलिनी जोशी, प्रतिभा गायकवाड, मीना भामरे,
दिलीप धनगे, नंदलाल कापुरे,
कल्पना मोरे, सुनिता वाईकर, शैला जाधव ,शोभा कुमावत,PSi सानप चित्राताई कोतवाल,शैलजा बैरागी ,गवळी मावशी ,विलास गांगुर्डे ,राहुल बच्छाव आदींनी प्रयत्न केले.