Home Breaking News नाम फाउंडेशनतर्फे विधवा शेतकरी महिलेला मदतीचा धनादेश

नाम फाउंडेशनतर्फे विधवा शेतकरी महिलेला मदतीचा धनादेश

निर्मल बँकेच्या अध्यक्ष पूजा मानमोडे यांच्या हस्ते वितरण
नागपूर : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या नाम फाउंडेशनच्या माध्यमातून उमरेड तालुक्यातील एका विधवा महिलेला आर्थिक मदत करण्यात आली. निर्मल अर्बन बँकेच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात निर्मल अर्बन बँकेच्या अध्यक्ष पूजा मानमोडे यांच्या हस्ते शेतकरी विधवा रुचिता प्रशांत आगलावे यांना धनादेश वितरित करण्यात आला. यावेळी नाम फाऊंडेशनचे समन्वयक उमेश पाटील उपस्थित होते.
रुचिता यांचे पती प्रशांत आगलावे यांनी १ मे २०२४ रोजी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली होती. त्यानंतर रुचिता यांनी नातलगांमार्फत नाम फाउंडेशनकडे मदतीची विनंती केली. फाउंडेशनने शहनिशा केल्यानंतर रुचिता यांना आर्थिक सहाय्य मंजूर केले. नाम फाऊंडेशनने केलेले आर्थिक सहाय्य हे आपल्यासाठी संजीवनी असून मुलांच्या शिक्षणासाठी ही मदत उपयोगात आणणार असल्याचे रुचिता यांनी यावेळी सांगितले.
पूजा मानमोडे यांनी नाम फाउंडेशनने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले आणि समाजातील गरजू शेतकरी महिलांना सहाय्य करण्याच्या प्रयत्नांचे स्वागत केले. यावेळी रुचिता आगलावे यांनीही नाम फाउंडेशनचे आभार मानले. यावेळी वरिष्ठ पत्रकार आनंद आंबेकर, देवनाथ गंडाटे, संकेत मंगाम यांची उपस्थिती होती.
सदर बातमी देवनार गंडाटे सर यांची
Previous article4 मार्च रोजी हिमायतनगर येथे इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन …. 
Next articleडोल्हारी येथील महिला बचत गटांनी सुरु केलेल्या पापड उद्योग व हळद कुकरचे मान्यवरांनी केले उद्घाटन.