Home कृषीजागर नांदेड जिल्हा परिषदेचा वरीष्ठ कृषि अधिकारी.. हिमायतनगर तालुक्याचा काॅलीटी कंट्रोलर कसा?

नांदेड जिल्हा परिषदेचा वरीष्ठ कृषि अधिकारी.. हिमायतनगर तालुक्याचा काॅलीटी कंट्रोलर कसा?

👉विशेष खरीप हंगाम 2022

👉 फक्त खरीप हंगामात येतो नमुने काढायला….

मारोती अक्कलवाड पाटील सवनेकर
दिनांक – 10 जुन 2022

“भारत हा कृषिप्रधान देश आहे.” हि मन सर्वस्तृत सर्वत्र परीचित असली तरी, ज्यांनी हिमायतनगर पंचायत समिती तेथे कृषि अधिकारी म्हणून सतत तिन ते सहा वर्ष सेवा केली. त्यांची पदोन्नती नांदेड जिल्हा परिषद येथे वरीष्ठ कृषि अधिकारी म्हणून बढती झाली…असली तरी, आपला कायम दबदबा आजतागायत हिमायतनगर तालुक्यातील सर्व कृषि सेवा केंद्रावर कायम आहे.

यांना जिल्हा परिषद नांदेडचा पदभार असतांनाच फक्त हिमायतनगर तालुक्यातील कृषि केंद्र तपासणी करण्याचे अधिकार कोण दिलेत. हाही फार मोठा संशोधनचा विषय आहे.
हिमायतनगर तालुक्याचे प्रभारी तालुका कृषी अधिकारी हे स्थानिकचे आहेत. परंतु काॅलीटी कंट्रोलर हे जिल्हा परिषद नांदेडचे कृषि अधिकारी आहेत. म्हणुन कानाडोळा करीत आहेत. प्रभारी तालुका कृषी अधिकारी हिमायतनगर यांनी कुठे, कुठे शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी काय? दिवे लावले. हाही मुल्यमापनाचा विषय आहे.
आज दहा जुन उजाडला तरी बळीराजा सतत आकाशाकडे डोळे भरून पाहत आहे. काही शेतकऱ्यांनी जिवणामरणांचा खेळ समजुन धुळ पेरणी केली.
पण….. जिल्हा परिषदेचे वरीष्ठ कृषि अधिकारी तथा हिमायतनगरचे काॅलीटी कंट्रोलर आजपर्यंत कुठे होते. हा अतिशय संशोधनाचा विषय आहे.
फक्त शेतकऱ्यांची परिस्थिती जेंव्हा.. जेंव्हा नाजुक होते. हाच नांदेडचा वरीष्ठ कृषि अधिकारी, हिमायतनगर येथील. सर्व कृषि सेवा केंद्रावर मोठ्या वजनात, थाटामाटात येतो. आणि लुबाडणुक करतो. अशी तक्रार छोट्या कृषि सेवा केंद्र चालक यांनी केली. परंतु तमाम हिमायतनगर तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधीनी या नांदेड जिल्हा परिषदचा वरीष्ठ अधिकारी..दोन दोन पदभार घेतोच कसा. यांचा लुबाडणे हा धंदा बंद केला पाहिजे.
नाहीतर सर्व शेतकरी संघटनेचे, कार्यक्रते, पदाधिकारी आणि विविध बळीराजाचे संघटन, शेतकरी नेते यांनी आवाज आगामी काळात उठविणार आहेत. असे आमच्या प्रतिनिधींना कळविले आहे. हि संबंध हिमायतनगर तालुक्यातील शेतकरी बांधवांची मागणी आहे.

Previous articleशेतक-यांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार!
Next articleमनरेगा सिंचन विहीरींची देयके रखडली, शेतकरी हैराण!