Home Breaking News जलंब येथे छत्रपती शिवाजी महाराजांची 395 वी जयंती अत्यंत जल्लोषात आणि भक्ती...

जलंब येथे छत्रपती शिवाजी महाराजांची 395 वी जयंती अत्यंत जल्लोषात आणि भक्ती भावाने साजरी करण्यात आली

संदिप देवचे 9860426674 फेब्रुवारी 19, 2025

जलंब:जलंब येथे शिवभक्त मित्र मंडळा च्या वतीने आज दिनांक 19/02/2025 बुधवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती अत्यंत जल्लोषात आणि भक्ती भावाने साजरी करण्यात आली.

या उत्सवाच्या वातावरणाने सर्वांची मने भारावून गेली. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 7ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली नंतर संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतीमेची मिरवणुक ढोल‌ ताशांच्या गजरात कुठल्याही प्रकारचे नाच गाणे न वाजवता संपुर्ण गावात फक्त शिवाजी महाराजांचा पोवाडा म्हणत काढण्यात आली. यावेळी संपुर्ण गावात महीला मंडळी कडुन रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. गावात ठिक ठिकाणी ग्रामस्थांन‌ कडुन शिवाजी महाराजांची प्रतीमा पुजन‌‌ करून आरती करण्यात आली व नंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे संध्याकाळी 9 ला सांगता करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने शिवभक्त ग्रामस्थ उपस्थित होते…

Previous articleदेगांव येथील फुले सार्वजनिक वाचनालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी .
Next articleजलंब व पि.राजा पोलीस स्टेशन प्रशासकीय ईमारतीचे आज कामगार मंत्री अँड आकाशदादा फुंडकर यांच्या हस्ते भुमीपुजन