Home Breaking News महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र परमेश्वर मंदिर कमिटीच्या वतीने भव्य यात्रा महोत्सव..

महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र परमेश्वर मंदिर कमिटीच्या वतीने भव्य यात्रा महोत्सव..

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक, नांदेडदिनांक- 23 जानेवारी 2025

नांदेड जिल्हातील हिमायतनगर येथे दरवर्षिप्रमाणे याही वर्षी यात्रामहोत्सवाचे आयोजन केले आहे. मंदिर कमिटीने भव्य बक्षिस ठेवत विविध स्पर्धा ठेवण्यात आल्या आहेत. मराष्टा्त प्रसिद्धी असलेले श्रीक्षेत्र हिमायतनगर येथील संपुर्ण भारतात प्रसिद्ध असलेली भगवान परमेश्वरांची उभी असलेली मुर्ती अतिशय आर्कषक व तेवढीच सुबक आहे.

महाशिवरात्रीला अंलकारीत श्री भगवान परमेशवराचे दर्शन घेण्यासाठी मध्यरात्री बारा वाजतापासुन भाविक गर्दी करतात.

दिनांक 24 फेब्रुवारी पासुन सुरू होणा-या यात्रा महोत्सात विविध धार्मीक कार्यक्रम व स्पर्धाचे आयोजन केले आहे. त्यामध्ये शालेय बडबडगित स्पर्धा, महिलांसाठी विविध स्पर्धा, भव्य पशु प्रदर्शन,शंकरपट स्पर्धा, भजन स्पर्धा, कबड्डी स्पर्धा, शालेय विविध गुणदर्शन स्पर्धा ( सांस्कृतिक कार्यक्रम), भव्य फॅन्सी वेशभुषा स्पर्धा आणी शेवटी भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे…किर्तन, प्रवचन, हरीपाठ आदी धार्मीक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तरी सर्व भाविकभक्त, खेळाडु, विद्यार्थी, पशुपालक आणखी व्यापारी बांधवांनी या यात्रेत सहभागी व्हावे असे यात्रा कमिटीच्या पदाधिका-यांनी केले आहे.

Previous articleजलंब व पि.राजा पोलीस स्टेशन प्रशासकीय ईमारतीचे आज कामगार मंत्री अँड आकाशदादा फुंडकर यांच्या हस्ते भुमीपुजन
Next articleजेसीबी घेऊन जाणारा ट्रक रेल्वेब्रिजखाली अडकला!