हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्युज
मो. नंबर – 8983319070
य नाशिक :राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांतील पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या संकलित मूल्यमापन चाचणी २ परीक्षेचे वेळापत्रक राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने(एस सी ई आर टी)जाहीर केले आहे.या वेळापत्रकानुसार दिनांक ८ ते २५ एप्रिल २०२५ या कालावधीत ही चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे.त्यामुळे राज्य मंडळाच्या सर्वच शाळांतील परीक्षा एकाच वेळी घेण्यात येणार असल्याने या वेळापत्रकावर नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ तसेच जिल्ह्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी आक्षेप घेत त्याबाबतचे निवेदन माध्यमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी प्रकाश अहिरे साहेब जि प नाशिक यांना देण्यात आले आहे.परीक्षा एप्रिल अखेरीस होणार असल्याने या वेळापत्रकावर शैक्षणिक क्षेत्रातील सर्वच स्तरातून आक्षेप घेण्यात आला असून,इतक्या उशिरा संकलित मूल्यमापन चाचणी परीक्षा झाल्यास दिनांक १ मे रोजी निकाल जाहीर करण्यास मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होऊन शाळा १ मे रोजी निकाल कसा जाहीर करणार,असा प्रश्न शिक्षण क्षेत्रातील विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे.एससीइआरटीने दिलेल्या सूचनांनुसार शासकीय,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि खाजगी अनुदानित शाळांमध्ये संकलित मूल्यमापन चाचणी परीक्षेसाठी प्रथम भाषा,गणित,आणि तृतीय भाषा इ.विषयांच्या प्रश्नपत्रिका शासनाच्या वतीने पुरविण्यात येणार असून इतर व्यवस्थापनाच्या शाळांनी सर्व प्रश्नपत्रिका शाळा स्तरावर तयार करावयाच्या आहेत.या प्रसंगी नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस.बी.देशमुख यांनी वरील परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत व्यथा मांडून सदर परीक्षेच्या तारखांमध्ये बदल करून शाळांना निकाल तयार करण्यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध करून देण्यात यावा.अशी मागणी मुख्याध्यापक संघाच्या वतीने केली आहे.या प्रसंगी जिल्ह्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी देखील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या प्रमुख मागण्या मांडल्या आहेत.सदर परीक्षेच्या वेळापत्रकाबाबतचे निवेदन माध्यमिक शिक्षण विभागाने त्वरीत शासनास पाठवून ग्रामीण भागात पाणी टंचाई, वाडया वस्त्यांवरून शाळेत येणारी मुलं या बाबीचा विचार करून वेळापत्रकात बदल करावे अन्यथा आंदोलन पुकारले जाईल . या वेळी मुख्याध्यापक संघाचे सचिव एस बी देशमुख, उपाध्यक्ष प्रदिप सांगळे , विस्तार अधिकारी श्रीमती पिंगळकर मॅडम. नाशिक जिल्हा TDF चे जिल्हा अध्यक्ष रविन्द्र मोरे, माध्यमिक शिक्षक संघाचे शहर अध्यक्ष मोहन चकोर,संघाचे जिल्हा सचिव सी पी कुशारे, भगीरथ घोटेकर, सचिन पगार, ए .के खालकर, निलेश ठाकुर, भाऊसाहेब शिरसाठ, चंद्रशेखर सावंत, सुभाष दळवी , एस के देवरे, प्रा .बी .ए . बंगाळ, बी . के नागरे, डॉ अनिल माळी, मनोज वाघचौरे, एम डी काळे मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते .