Home Breaking News सतांचे विचार अंगिकारून आईवडील आणी गोमातेची सेवा करा पुण्य मिळेल.

सतांचे विचार अंगिकारून आईवडील आणी गोमातेची सेवा करा पुण्य मिळेल.

हभप प. पु. आचार्य बालयोगी स्वामी गजेंद्र महाराज यांचे प्रतिपादण

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 13 मार्च 2025

नांदेड जिल्हयातील हदगांव तालुक्यातील श्री शिव सद्गुरु स्वामी दत्त संस्थान मठ, तिर्थक्षेत्र मौजे पिंपळगांव येथे दिनांक सहा मार्च ते तेरा मार्च या दरम्यान भव्य शिवमहापुराण कथा, श्री 108 कुंडी विश्वशांती दतयाग महायज्ञ व नाम संकिर्तन सोहळयाचे तपस्वी बालयोगी, गोवत्स स्वामी व्यंकटेश महाराज यांनी या कार्यक्रमाचे भव्यदिव्य आयोजन केले आहे.
भव्य शिवमहापुराण कथा अनंत श्रीविभुषित श्रीमजगद्गुरु व्दा्राचार्य श्री अग्रपिठधिश्वर एवं मलुकापिठाधिश्वर स्वामी श्री राजेंद्र दास देवाचार्यजी महाराज यांच्या पवित्र वाणीतुन लाखो भाविकांना श्रवण करता आली.
शेवटच्या दिवशी हभप आचार्य बालयोगी गजेंद्र महाराज यांनी काल्याचे सुंदर किर्तन करीत ते म्हणाले स्वामी व्यंकटेश महाराजांच्या संकल्पामुळे हा भव्यदिव्य कार्यक्रम सिध्दीस, पुर्णत्वास गेला आहे. ते पुढे म्हणाले संतांच्या संगतीत राहुण संतांचे विचार आत्मसात करा. संतानी ठरविले तर जंगलही मंगल होते. आणी ते याठिकाणी झालेले आहे. म्हणुन चांगल्या विचारांची कास धरा. आईवडील आणी गोमातेची निरंतर सेवा करा पुण्य मिळेल हे मी नारदाच्या गादीवरुन सांगतो आहे. संत हे ज्ञान प्राशन करण्याचे काम करतात असेही म्हणाले.
तिर्थक्षेत्र पिंपळगांव येथे भव्य कार्यक्रम आयोजित करून आपणाला साधुसंताचे दर्शन घडविण्याचे काम स्वामी व्यंकटेश महाराजानी केले आहे. हे महान कार्य आहे.
मौजे तिर्थक्षेत्र सतत आठ दिवस सकाळ, संध्याकाळी महाप्रसादाची , राहण्याची व्यवस्था केली होती. लाखो भाविकांनी महाप्रसादाचा अतिशय शांतपणे लाभ घेतला आहे. हजारो भाविकांनी या महान कार्यासाठी आपली रात्रंदिवस सेवा गेली आहे. किर्तन संपल्यानंतर स्वामी व्यकटेंश महाराजांनी सर्वांचे मनापासुन आभार मानले.

Previous articleहोळीनिमित्त सतत २५ व्या वर्षी होणा-या महामुर्ख कविसंमेलनाची जय्यत तयारी….
Next articleशेतक-यांना पिकविम्याची प्रतिक्षा!