Home Breaking News त्रिशताब्दी वर्षानिमित्त अहिल्या जन्मोत्सव पंचवटी नियोजन बैठक संपन्न..

त्रिशताब्दी वर्षानिमित्त अहिल्या जन्मोत्सव पंचवटी नियोजन बैठक संपन्न..

अध्यक्षपदी निवृत्ती धात्रक उपाध्यक्षपदी हेमंत शिंदे, देवराम रोकडे यांची निवड

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भुमी राजा न्युज
मो. नंबर – 8983319070

प्रतिनिधी हिंदू धर्म रक्षक पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्म सोहळा समिती आयोजित अहिल्या जन्मोत्सव पंचवटी त्रिशताब्दी वर्ष भव्यतव्य स्वरूपात साजरा होण्यासाठी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या काशीविश्वेश्वर मंदिरावरती ही नियोजन बैठक पार पडली.

भारत सरकारने संपूर्ण भारतभर ही वर्ष पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मोत्सवानिमित्त त्रिशताब्दी वर्ष म्हणून साजरी करण्याचे ध्येय हाती घेतले आहे. मातोश्रींचा इतिहास संपूर्ण भारतभर गावोगावी खेडूपाडी जागृत हवा यासाठी केंद्र सरकार आपलं परीने प्रयत्न करत आहे. सालाबादप्रमाणे अहिल्या जन्मोत्सव पंचवटी हा सोहळा गेली अनेक वर्षापासून सुरू आहे. हा सोहळा रामकुंड पंचवटी या ठिकाणी 31 मे रोजी सायंकाळी सात वाजता सुरुवात होतो.या ठिकाणी भव्य पुरुष नाही तसेच फटाक्यांची अतिश बाजी होणार आहे.

रामदास काळे यांचे व्याख्यान त्या पार्श्वभूमीवर रामकुंडावर शुक्रवारी आयोजित करण्यात आले आहे. विशेष कार्यक्रमासह गंगा गोदा आरतीसह अहिल्या आरतीचेही सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समितीने , आयोजन करण्यात आले.

याही वर्षी समितीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर त्रीशताब्दी वर्षानिमित्त 300 मूर्ती वाटप करण्याचे ध्येय श्री समाधान बागल यांनी केले. आणि एकाच वेळी तीनशे ठिकाणी हा जन्मोत्सव साजरा होणार. समितीच्या वतीने वर्षभर अखंड महाराष्ट्रभर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मोत्सवानिमित्त छोटी मोठी सोहळे साजरी केली. होळकर शाही चा इतिहास जागृत करण्यासाठी समितीने अनेक उपक्रम राबविले. आणि शेवटी 31 मे चा हा त्रिशाताब्दी सोहळा भव्य दिव्य स्वरूपात साजरा होण्यासाठी भारतातील सर्वात मोठी जन्मोत्सव सोहळा हा नासिकच्या रामकुंडा वरून दिसणार आहे. यानिमित्त नियोजन बैठक पार पाडण्यात आली. या सोहळ्याच्या अध्यक्षपदी निवृत्ती धात्रक सर यांची निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्षपदी हेमंत शिंदे साहेब देवराम भाऊ रोकडे यांची नियुक्ती करण्यात आली. नियोजन समिती प्रमुख ऋषिकेश डापसे,ज्ञानेश्वर ढेपले,कार्याध्यक्षपदी अण्णासाहेब सपनार तसेच राजेभाऊ बादड,स्वागत अध्यक्ष पदी शोभाताई काळे, अमोल गजभार सर,प्रशांत बागल सर, भूषण जाधव,ललित पवारयांची नियुक्ती करण्यात आली.नियोजन समिती सदस्य पदी श्याम गोसावी,पंढरीनाथ कोरडे,रामेश्वर खनपटे मुंजाभाऊ ढोले कल्पेश शिंदे,

मार्गदर्शन समिती पदी दिगंबर भाऊ मोगरे,मुकुंद राजे होळकर पुरोहित महासंघाचे शुक्ला काका,मच्छिंद्र भाऊ बिडगर गणेश भाऊ निंबाळकर दत्तू भाऊ बोडके,अनिलभडांगे,संगीता ताई पाटील,विनायक जी बबलू मिर्झा, काळदाते,नवनाथजी ढगे,तुषार चिंचोले,शशिकांत कोथिंबिरे,भास्कर जाधव राजाभाऊ पोथारे,नवनाथ शिंदे सुभाष शिरोळे सर,खंडेराव पाटील, शिवाजी ढगे,शशिकांत वाघ, देविदास भडांगे,इत्यादी.

Previous articleहिमायतनगर तालुक्यात अवकाळी पावसाचा कहर…
Next articleगोपतवाड – बुध्देवाड पा. परीवाराच्या विवाह सोहळ्याला पाहुणे, चाहते आणी हितचिंतकांनी अलोट गर्दी…