Home Breaking News गोपतवाड – बुध्देवाड पा. परीवाराच्या विवाह सोहळ्याला पाहुणे, चाहते आणी हितचिंतकांनी अलोट...

गोपतवाड – बुध्देवाड पा. परीवाराच्या विवाह सोहळ्याला पाहुणे, चाहते आणी हितचिंतकांनी अलोट गर्दी…

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 24 /05/2025

हिमायतनगर तालुका संरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष परमेश्वर गोपतवाड यांचे व्दितीय चिरंजीव सहशिक्षक सतिषचा शुभविवाह चि.सो. का. मयुरी सोबत शुक्रवारी 23 मे रोजी थाटामाटात संपन्न झाला..

या विवाह सोहळ्याला किमान पाच ते साडेपाच हजार पाहुणे, चाहते, हितचिंतक, मित्र, सहकार, बॅक, साधुसंत, पत्रकार, शिक्षक बंधु, व्यापारी, कष्टकरी, शेतकरी, सामाजिक, धार्मीक, शैक्षणीक , कृषि, आरोग्य आदी क्षेत्रातील पाहुण्यांनी रेकाॅर्डब्रेक गर्दी केल्याचे दिसुन आले..

या शुभविवाह सोहळ्याला जमलेली गर्दी पासुन स्वपक्षीय कार्यकर्ते , पाहुणे, मित्र परीवार, शेतकरी यांच्या मुखातुन मुक्तकंठाने गोपतवाड परीवाराची प्रशंशा केली…

ज्ञानोबा माऊली तुकाराम यांच्या नामाच्या जयघोषात वधुवरांचे विवाहमंचावर टाळ, मृदंगाच्या तालावर आगमन…

👉 राजकीय विश्लेशक यांनी तर चक्क या गर्दीवरुन आगामी जिल्हा परीषद निवडणुकीची हि नांदीच आहे.असेही सहज बोलतांना म्हणुन टाकले…काहीही असो पाच हजार पाहुणे मंडळींचा जनसमुदाय जमा करणे…सोपे नाही…जनसामान्यांच्या सुखदुःखात अगदी सहज उपस्थीत असणारा नेता म्हणजेच परमेश्वर गोपतवाड यांचे नांव जनताजर्नादन घेत आहे हे मात्र निश्चित आहे…

Previous articleत्रिशताब्दी वर्षानिमित्त अहिल्या जन्मोत्सव पंचवटी नियोजन बैठक संपन्न..
Next articleअवकाळी पावसामुळे उन्हाळी मशागत करण्यास येतो व्यत्यय..