कार्यालयीन प्रतिनिधी
वाडेगाव बाळापुर रस्त्यावर असलेले कुपटा गावाजवळ वघाडी नाल्याच्या कठडे असलेल्या पुलावरून भरधाव वेगाने कठडे तोडुन कार पुलाखाली कोसळुन त्या कारमधील तीन व्यक्ती जागीच मरण पावले.
एक जण गंभीर जखमी असुन हि घटना दिनांक एक जुन रात्री 10.40 च्या सुमारास घडली गाडी क्रमांक एम एच.30 ऐ झेड.7557 प्राप्त माहितीनुसार हि कार वाडेगाव ते बाळापुर ला येत असतांना घडली.
सदर अपघातात कन्हैयासिंंग ठाकुर,वय 55 वर्ष,विशाल सोलंकर.वय 50 वर्ष आणी सुनिल शर्मा वय 45 वर्ष या तिघांचा मृत्यू झाल्याचे बाळापुर पोलिस यांनी सांगितले.
अपघातात आशिष ठाकुर जखमी असुन त्याचा उपचार बाळापुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करून पुढील उपचारासाठी अकोला हलवले
अपघाताची माहिती मिळताच कुपटा,मांडवा,वाडेगांव,आणी बाळापुर मधील युवकांनी धाव घेतली अपघातामध्ये अडकलेल्या व्यक्तीला काढण्यास पोलीसांना मदत केली.
अपघात ईतका प्रचंड होता कि गाडीचा अक्षरक्षा.चुराडा झाला होता असे प्रत्यक्षदर्शी यांनी सांगीतले आहे.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक सचिन पहुरकर पोलीस कर्मचारी सचिन कानडे.प्रशांत डोईफोडे,अविनाश आडे, रामेश्वर देवपुजे, संदिप पेड, सिध्देश्वर कोळझाडे
ई.लोकांना पंचनामा केला.