
कार्यालयीन प्रतिनिधी:- आज दिनांक 26 जुलै 2025 रोजी अकोला नाका बाळापूर येथे शासकीय सभागृहात प्राचार्य दिलीप इंगळे सर यांच्या अध्यक्षतेखाली व अमरावती विभागिय समन्वयक सिध्दार्थ देवदरीकर,जिल्हा समन्वयक डॉ. पोहरे सर,बी.एस.सोनोने सर,समन्वयक निलेश वाहूरवाघ व साहेबराव ओइंबे यांच्या प्रमुख उपस्थिती मधे संपन्न झाली.

सभेत प्रमुख वक्त्यांनी संघटन,चळवळ मजबूत करुन समाजामध्ये जाऊन जागृती करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने तन,मन,धनाने कार्य करायला पाहिजे त्यासाठी प्रत्येक सभासदांनी कृतीयूक्त कार्यक्रम हाती घेतले पाहिजे. असे विचार व्यक्त केले.
या सभेचे आयोजन पंजाबराव भिलंगे सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांनी केले करून.या कार्यक्रमाला शेकडो लोकांच्या उपस्थितीत दीपक तायडे सर यांनी परिश्रम घेतले. या सभेला प्राचार्य दिलिप इंगळे, एम.एन.वानखडे सर,दीपक तायडे सर,विनोद इंगळे सर,प्रेमराज डोंगरे सर, कडू खंडारे सर, पत्रकार अनिल उमाळे, माजी सरपंच नाजूकराव इंगळे, संतोष सिरसाट, सुनील तेलगोटे व रामेश्वर तेलगोटे उपस्थित होते.



