दिनांक -27/07/2025
कल्याण वानखेडे
तालुका प्रतिनिधी
हिमायतनगर
हिमायतनगर तालुक्यातील कोठा ,उमरखेड तालुक्यातील सावळेश्वर दोन ठिकाणी संघर्ष धरणविरोधी समिती ची बैठक पार पडली यामध्ये फार मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते व सर्वांचा या सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला कडाडून विरोध आहे असं शेतकऱ्यांच्या मते हे जलविद्युत प्रकल्प शेतकऱ्यांच्या हिताचा नसून परवडणारा नाही यवतमाळ व नांदेड या द़ोन जिल्ह्यातील सुपीकता असणारी जमीन आणि समृद्ध असलेली शेती तसेच भरपूर मोठ्या प्रमाणात असलेले जंगल त्यात अनेक वनस्पती आणि झाडे ही या धरणामुळे संकटात येतील आणि निसर्गाचे संतुलन बिघडेल त्याचबरोबर आपल्या दोन्ही जिल्ह्यांना फायदा कमी त्यामध्ये सर्वात जास्त फायदा हा तेलंगणा राज्याचा होणार आहे यासाठी येथील शेतकऱ्यांना परवडणारे नाही जर सरकारला शेतकऱ्यांचे हित जोपायचे असेल तर गावोगावी उच्च प्रतीचे बंधारे उभारा आणि त्यामधून पाणी साठवा तसेच विद्युत निर्मिती करायचीच असेल तर प्रत्येक गावामध्ये गायरान आहेत गावठाण आहेत यांच्या जागा आहेत त्यामध्ये सोलार चे प्लांट उभे करा यामधून शेतकऱ्याचा जमिनीही जाणार नाहीत आणि शेती देखील वाचेल यासाठी बुडीत क्षेत्र असणाऱ्या गावच्या सरकारच्या विरोधात व धरणाच्या विरोधात शेतकऱ्या मोठ्या प्रमाणात विरोध दिसत आहे आणि पुढील काही दिवसात तो तीव्र होण्याची शक्यता दिसत आहे प्रत्येक गावामध्ये धरण विरोधी मीटिंग शेतकरी घेत आहेत आणि त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद देखील मिळत आहे शेतकऱ्यांचे म्हणणे असे आहे की आपण विरोध नाही केला तर शेती तर जाईल पण त्याच बरोबर गावे देखील जातील धरणामध्ये कोणत्याही शेतकऱ्याचा फायदा होणार नाही त्यामध्ये उलट शेतकऱ्यांच्या जमीन पाण्याखाली जातील आणि शेतकरी देशोधडीला लागतील हीच सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे..



