Home Breaking News मतदान करण्यासाठी नवरदेव चक्क मतदान केंद्रावर पोहचला.

मतदान करण्यासाठी नवरदेव चक्क मतदान केंद्रावर पोहचला.

जिल्हा प्रतिनिधी:-बिलोली तालुक्यातील मौजे बेळकोनी बु. येथील नवरदेव आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी सवना ज. येथील अक्कलवाड परीवाराचे जावाई शंकर सायना बुद्धेवार रा. बेळकोनी बु. ता. बिलोली जिल्हा नांदेड येथील वरराजा चक्क आपल्या घोड्यावरील वरात मतदान केंद्राकडे वळविली आणि वेळातील वेळ काढुन मतदान केले. आपला मतदानाचा हक्क त्यांनी बजावला. तेही घोड्यावर स्वार होऊन…… स्वतःचे लग्न असुनही वेळेत मतदान केले. आणि लग्नमंडपात वेळेवर विवाह मंचावर पोहचला यावरून त्यांनी इतरांना आपल्या हक्काची जाणीव करून देऊन एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

Previous articleमाध्यमिक शाळाचे 5 वी ते 8 वी च्या वर्गाचे निकाल तपासणीची शिक्षण विभागानें सक्ती करू नये.
Next articleगोदावरी स्वच्छता अभियान ” मोहिमेचा 103 वा आठवडा गोदा नदी पात्राची स्वच्छता करुन साजरा करण्यात आला.