👉चोख बंदोबस्तसाठी पोलीसांचेही केले स्वागत….🌹
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हासंपादक नांदेड दिनांक- 22/08/2025
हिमायतनगर तालुक्यात प्रचंड अतिवृष्टी होऊन, शेतकरी अस्मानी संकटातुन कसाबसा सारवत शेतात काबाडकष्ट करणा-या बैलांचा बैलपोळा साध्या पध्द्तीने साजरा करण्यात आला आहे.
हिमायतनगर तालुक्यात व शहरात , ग्रामीण भागात शेतक-यांचा सर्जा-राजाचा पोळा उत्साहात व शांततेत साजरा करण्यात आला. तालुक्यात बैलपोळ्याला कुठेही गालबोट लागले नाही..
सवना ज. येथील बैलपोळ्याचे मानकरी माधवराव अनगुलवार पो.पा. यांनी विशेष मानकरी म्हणुन “लव्हु लक्ष्मण अनगुलवार” यांच्या जोडीला समोर ठेवत ढोलतास्याच्या गजरात “हरहर महादेव शंभुच्या नावाने हरहर बोला” अश्या गजरात मोठ्या उत्साहात फटाके फोडत, वाजत..गाजत मिरवणुक हनुमान मंदिराकडे निघाली…पाच भाविकांनी मंगलाष्टके गाऊन बैलांच्या डोक्यावर अक्षदांचा वर्षाव केला…
👉 हिमायतनगर पोलीस स्टेशनचे बिट जमादार जाधव साहेब आणी त्यांच्या सहकार्याचा सत्कार मानकरी लव्हु अनगुलवार, तंटामुक्ती अध्यक्ष कैलास अनगुलवार यांनी हार, श्रीफळ देऊन केला आहे…
👉ग्रामीण भागातील देशी दारू बंद असल्यामुळे बैलपोळा शांततेत पार पाडला आहे…अशी नागरीकातुन चर्चा ऐकावयाला येत होती…
एकंदरीत हिमायतनगर तालुक्यात बैलपोळा सण शांततेत साजरा करण्यात आला आहे.



