भूमीराजा हिमायतनगर तालुका प्रतिनिधी अवधूत कल्याणकर9 767375180
हिमायतनगर तालुक्यातील वाढोणा येथे नवसाला पावणाऱ्या माता कालिंका देवी मंदिरात सोमवार दि. २२ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाची सुरुवात होत असून, भक्तांसाठी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
📿 कार्यक्रम विशेष🔸 दररोज सकाळी सप्तशती पाठ
🔸 दुपारी संगीतमय देवी भागवत कथा प्रवचन – हभप सत्यदेवजी महाराज भांबुलकर
🔸 संध्याकाळी हरिपाठ व महाआरती
🔸 १ ऑक्टोबर – नवमी होमहवन व पूर्णाहुती
🔸 २ ऑक्टोबर – विजयादशमी मिरवणूक ढोल-ताशांच्या गजरात
🌺 या उत्सवाचे आयोजन मंदिर समिती व गावकऱ्यांच्या सहकार्याने करण्यात आले असून, पंचक्रोशीतील सर्व भक्तांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नवरात्रोत्सव माता_कालिंका_देवी विजयादशमी वाढोणा हिमायतनगर धार्मिककार्यक्रम भक्तिपर्व



