Home Breaking News पळशी बु. सरपंचाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून फौजदारी कारवाई करा

पळशी बु. सरपंचाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून फौजदारी कारवाई करा

सुरेश गव्हाळ यांची गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार

अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी भुमिराजा न्यूज नेटवर्क

खामगाव – तालुक्यातील पळशी बु. ग्रामपंचायतीचे सरपंच सुधाकर पल्हाडे यांनी त्यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचारा केल्याचा आरोप करत याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर त्वरित फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गावचे प्रतिष्ठित नागरिक तथा भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष सुरेश गव्हाळ यांनी केली आहे.
याबाबत गव्हाळ यांनी खामगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असून त्यात नमूद केले आहे की, पळशी बु .येथील सरपंच यांनी शासनाच्या पैशांचा अपहार करून स्वतःचे हित साधुन घेतले आहे. सन २०१९ पासुन तर आज पर्यंत त्यांनी खूप मोठा भ्रष्टाचार व अपहार केला आहे. त्यामळे त्यांच्या कार्यकाळात झालेले सर्व कामांची वस्तुनिष्ठ चौकशी होणे गरजेचे आहे. त्यांनी आपल्या नातेवाईकांकरीता सन २०१९-२०२० मध्ये अनाधिकृत पाण्याचा हौद बांधून दिला. तसेच आपल्या स्वतःच्या घरासमोर मागासवर्गीय वस्त्ती दाखवून सन २०२१-२०२२ मध्ये पेव्हर ब्लॉक बसवून घेतले आहेत. ग्रामपंचायतचे गाडे स्वतःच्या भावाला देवून त्याची भाडे न घेता मोफत दिले आहे. तसेच गावातील विकास कामांवर बोर्ड न लावणे , कामे अर्धवट करून बिले काढले , गावात भेदभाव करणे , मर्जीनुसार काम करणे, विकास करतांना हेतू परस्पर पणे काही भागांचा विकास व काही भकास अशा प्रकारचे कामची करणे असे असा कारभार केला आहे. त्यांच्या अशा वर्तनुकीमुळे त्यांनी शासनाच्या निधीचा अपहार व भ्रष्टाचार केला आहे. तरी ते पदावर बसवल्यापासून तर आतापर्यंत केलेल्या सर्व हेडच्या कामांची वस्तुनिष्ठ चौकशी करून त्यांचेकडून अपहार केलेल्या रक्कमेची भरपाई करून घ्यावी व अपहार केल्या प्रकरणी त्यांचेवर तत्काळ फौजदारी कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी गव्हाळ यांनी केली आहे. या तक्रारीच्या प्रती लिपी त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.बुलढाणा व सचिव ग्रामपंचायत पळशी बु. यांना दिल्या आहेत.

Previous articleबाळापुर मधिल शेकडो कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीत श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थित पक्षप्रवेश.
Next articleआरोग्य शिबिर थांबवल्यामुळे हजारो रुग्ण उपचारापासून वंचित ……महिला जिल्हाप्रमुख शितल भांगे पाटील