लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदन
दोषीवर कडक कारवाईची केली मागणी
अकोला : २३ सप्टेंबर : त्र्यंबकेश्वर नाशिक येथील पत्रकारांना झालेल्या मारहाणीचा लोकाभिमुख असलेल्या लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्यावतीने राज्यभरातून निषेध करण्यात आला. दोषीवार कडक कारवाई करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधिक्षक अर्चितजी चांडक यांच्याद्वारा मुख्यमंत्र्याकडे निवेदनाच्या माध्यमातून (मंगळवार २३ सप्टेंबर) रोजी करण्यात आली आहे.
त्र्यंबकेश्वर नाशिक येथे कुंभमेळ्याच्या आयोजना संदर्भात बोलावण्यात आलेल्या बैठकीला वृत्तपत्र, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. यावेळी त्यांची वाहने पार्किंगला लावताना कर पावतीच्या संदर्भात वादावादी निर्माण होऊन ‘झि-२४ तासचे योगेश खरे, पुढारी न्यूजचे किरण ताजणे, अभिजित सोनोने व इतर दोन पत्रकारांना खाजगी गुंडाकडून मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा निषेध करण्यात आला होता. आणि अशा या गावगुंडावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात येत होती. या घटनेतील अनेक पत्रकार अद्यापही रुग्णालयात उपचार घेत आहेत. याबाबत लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ अकोला जिल्हा शाखेच्या वतीने २३ सप्टेंबर रोजी दुपारी ४.३० वाजता राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यातील दोषीवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा, राज्यभरामध्ये पत्रकारांच्या वाहनांना टोल आणि वाहन तळकर यातून सूट देण्यात यावी. आणि आगामी काळामध्ये वाहन तळाचे खाजगी कंत्राटदार आणि पत्रकार यांच्यामध्ये वादावादी निर्माण होऊ नये. असे झाल्यास त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा यानुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ अकोला जिल्हा शाखेच्या वतीने पत्रकार, सदस्य, पदाधिकारी यांच्या वतीने संघटनेच्या संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम. देशमुख यांचे मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष पंजाबराव वर, जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) सागर लोडम यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी डॉ. अशोक शिरसाट, संदीप ग. देशमुख, गजानन एस. वानखडे, विजय देशमुख, योगेश अ. शिरसाट, गुलाम मोहसिन, संतोष श्रीराम मोरे, ज्ञानेश्वर ब. निखाडे, संतोष बाबुलाल गवई, युसुफ शेख (आर.आर.सी.न्युज), इरशाद अहेमद, चाँद रिजवी, रमेश समुद्रे (जिल्हा संघटक), मनोहर प्रभू मोहोड, नरेंद्र व्ही. देशमुख यांचे सहीने जिल्हा पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांचे मार्फत निवेदने देण्यात आले. या आंदोलनामध्ये राज्यभरामधून मोठा प्रतिसाद मिळाला.
आपला स्नेही : पंजाबराव वर मो.नं. ९९२२९२४६८४ जिल्हाध्यक्ष : लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ,अकोला जिल्हा



