कल्याण वानखेडे तालुका प्रतिनिधी
हिमायतनगर तालुक्यात जनावरांमध्ये लम्पी रोगाचा शिरकाव झाला आहे. त्यामध्ये मौजे पळसपूर येथील शेतकरी श्री सचिन जाधव पारटकर यांचा गो-हा किंमत अंदाजे 40000/- किंमतचे लंपी या साथीच्या रोगाने दगावला असून हिमायतनगर तालुक्यात लंपी या रोगाने थैमान घातले असून गावातील अनेक जनावारांना यांची लागन झाली आहे जनावारांच्या अंगावर गुदी येणे, फोड येणे ,चारा न खाणे ,थरथर कापणे जनावार अशक्त होणे असे लक्षणे दिसून येतात
तरी शेतकऱ्यांनी आपल्या जणावारांची काळजी घ्यावी व वेळीच उपचार करुण घ्यावा याच बरोबर जनावरांचा मृत्यू तर गावातील तब्बल 30
जनावरे बाधित असल्याची
माहिती शेतकरी देत आहेत
गेल्या सुमारे महिन्याभरापासून लंम्पी रोगाने ग्रस्त आहेत हिमायतनगर तालुक्यातील शेतकरी शेतीला जोड व्यवसाय बैल, तसेच दुग्ध व्यवसाय करतात. एका शेतकऱ्याकडे किमान 4 गाई तर काही कडे म्हैस आहेत. चांगल्या दुभत्या गाईची म्हैसशीची किंमत एक लाख रुपये आहे. पुन्हा लम्पी रोगाने शिरकाव केल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
लम्पी’ प्रतिबंधक लसीकरण मोहीम वेगात करावी अशी मागणी देखील शेतकरी करीत आहेत
दरम्यान 30 बाधितझाले आहेत त्यासाठी लसीकरणाची मोहीम लवकर त लवकर तालुकाभर राबवावी व ज्या शेतकऱ्यांचे गुरे लंपी रोगामुळे मरण पावले त्यांना अर्थीक मदत यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत..




