👉 सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी शेतक-यांना सहकार्य करण्याची गरज….
गट क्र. 212 शिवारात सेडवर विज पडून शेती साहित्य जळून खाक
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 23 /09/2025
हिमायतनगर – संबंध नांदेड जिल्हयात पावसाने कहर केला आहे..तसेच हिमायतनगर तालुक्यातील श्रीक्षेत्र बोरगडी येथील सायंकाळी मुसळधार पावसात वीज शेतकऱ्याच्या शेतातील गोठ्यावर कोसळल्याने, बोरगडी येथील कष्टकरी शेतकरी प्रभाकर संभाजी भाकरे यांच्या शेती गट क्रमांक 212 शुक्रवारी मध्यरात्री शेडवर (गोठ्यावर) विज कोसळल्याने या दुर्दैवी घटनेत वासरू मृत्यू झाले आहे तर दुसरीकडे शेती साहित्य मोटर, खत, पाईप पिकलर पुर्णपणे जळून खाक झालेल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे या घटनेमुळे बोरगडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
बोरगडी येथे विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झालं आहे,मागील आठवड्यापासुन महाराष्ट्र सह नांदेड जिल्हात पाऊस सुरू असताना विजांचा कडकडाट व वाऱ्यासह पावसमुळे शेतकऱ्यांचे अतोनात मोठे नुकसान झाले आहे.
शेतकरी यांना अठरा विश्व दारीद्रे संपता संपेना असच चालू असल्याने शेतकरी हवाल दिल झाला.सबंधीत शेतकऱ्यांना पंचनामा करून तात्काळ मदत मिळावी असी मागणी शेतकरी बांधवाकडुन होत आहे.



