Home Breaking News क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा

महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समितीचे आयोजन

शेख चाँद जिल्हा प्रतिनिधी

अकोला :- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे . जिल्ह्यातील उचपदस्थ अधिकारीआणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत
ही शोभायात्रा महाराणा प्रताप बगीचा पासून सुरू होणार असून गांधी रोड मार्गाने अशोक वाटिका चौक येथे शोभायात्रेचे समापण होणार असल्याची माहिती आयोजन समितीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली.

येत्या 11 एप्रिल रोजी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त शहरातून भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या आयोजन समितीला मार्गदर्शक म्हणून प्रकाश तायडे, सुभाष सातव, जयंत मसने, शत्रूघ्न बिडकर, संजय गोटफोडे हे आहेत तर समितीच्या अध्यक्षपदी ऍड.प्रकाश दाते , स्वागताध्यक्ष पदी आशिष ढोमणे तर कार्याध्यक्ष पदी अक्षय नागापुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीत कोषाध्यक्ष डॉ. नितीन देऊळकर, प्रवीण वाघमारे, रामदास खंडारे, उमेश मसने, राजुभाऊ वारोकार, लक्ष्मण निखाडे, सुनील उंबरकर, दीपक बोचरे, गणेश काळपांडे, प्रवीण तायडे, अमोल नावकार, अशोक रहाटे, योगेश धनोकार, सुनील जाधव, मनोहर इंगळे, महेंद्र काळे, गजानन नावकार, योगेश रहाटे, ऋषिकेश आमले, उज्वल उगले, सुनील जाधव, विजय इंगळे, सुरेश कलोरे, बंडु क्षीरसागर, मंगेश पांडे यांचा समावेश आहे तर महिला विभागात माया इरतकर, ज्योती गाडगे, भारती शेंडे, वनिता राऊत, सुमित्रा निखाडे, माधुरी दाते, माया काळपांडे, लीना देउळकर, सारिका इंगळे यांचा समावेश आहे. तर या आयोजनात बारा बलुतेदार संघाचा आणि इतर समाजाचा सुद्धा सहभाग असल्याचे आयोजकांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले.

असा राहणार शोभायात्रेचा मार्ग

सदर शोभायात्रा ही 11 एप्रिल रोजी सायंकाळी साडे पाच वाजता सिटी कोतवाली चौक, महाराणा प्रताप बगीचा येथून निघणार आहे. तदनंतर गांधी चौक, खुले नाट्यगृह, बस स्थानक चौक, पोष्ट ऑफिस चौक आणि अशोक वाटिका चौक येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करून समापन होणार आहे.

Previous articleपरीक्षा परिषदेच्या ‘टैट ‘चे गुण पत्रक उपलब्ध ; 20 एप्रिल पर्यंत मुदत
Next articleहेमंत शिंदे यांचे गोदाप्रतिष्ठान च्या वतीने वाढदिवसा निमित्त अभिष्टचिंतन