Home Breaking News *डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे ज्ञानार्जना साठीचे समर्पण युवावर्गाल दिशा देणारे : प्रा.शुभम निघुट*

*डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे ज्ञानार्जना साठीचे समर्पण युवावर्गाल दिशा देणारे : प्रा.शुभम निघुट*

मुक्ती महोत्सव २०२२ चा उत्साहात प्रारंभ

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नंबर – 8983319070

येवला नाशिक भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जगातील सर्वच धर्म ग्रंथाचा अभ्यास करून सत्यशोधकी वृत्तीनेच बुद्धाच्या धम्माचा स्वीकार केला असून अठरा ते वीस घंटे सातत्याने विद्याभ्यास करत डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे ज्ञानार्जना साठी जे समर्पण केले व जगाने ज्ञानाचे प्रतीक म्हणून त्यांचे कर्तृत्व स्वीकारणे हे भारतीयांसाठी अभिमानास्पद असून बाबासाहेबांचे ज्ञानार्जना साठीचे समर्पण आजही युवावर्गाल दिशा देणारे असल्याचे उदगार प्रा.शुभम निघुट यांनी काढले.
मुक्ती महोत्सव समिती,मुक्तीभूमी येवलाच्या वतीने ८७ व्या धर्मांतर घोषणा वर्धापन दिनानिमित्त मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह येवला येथे आयोजित स्पर्धा परीक्षा संधी व तयारी या विषयावर व्याख्यान प्रसंगी निघुट बोलत होते.
ग्रामीण, कष्टकरी, शेतकरी,शेतमजूरांच्या मुलांनी स्पर्धा परीक्षा अभ्यास तंत्र,नियोजन,व्यवस्थापन नीट आत्मसात करून उच्च अधिकार पदाच्या जागा मिळवल्या पाहिजे व त्या साठी अभ्यासातील सातत्य चिकाटी व झपाटलेपण येण्या करता छत्रपती शिवाजी महाराज यांचे युद्ध कौशल्य तथा व्यवस्थापन नजरेत ठेऊन महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रमाणे ज्ञानार्जनाची गोडी स्वतःला लावावी असे निघुट म्हणाले.
भारतीय संविधान आणि बुद्ध व त्यांचा धम्म यातून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली मानवी मूल्य-सन्मानाची मांडणी लोकशाही,समता,स्वातंत्र्य, न्याय,बंधुता,धर्मनिरपेक्ष ता,राष्ट्रवाद,राष्ट्रीय एकता-एकात्मता भारतीय संविधानिक मूल्य विचार नीट समजून घेऊन राष्ट्र उभारणीत युवकांनी प्रथम राष्ट्र व नंतर धर्म ह्या तत्वाचा अंगीकार करावा असे मत ह्यावेळी मुक्ती महोत्सवाचे निमंत्रक,प्रवर्तक शरद शेजवळ यांनी प्रस्ताविकेत सांगितले.
मुक्ती महोत्सवाचे उदघाटन वसतिगृह अधीक्षक ज्ञानेश्वर लोखंडे यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते सुरेश खळे (मामा) होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन,आभारप्रदर्शन राजरत्न वाहुळ यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वसतिगृह कर्मचारी निलेश शेटे प्रवीण थोरात नितीन आभाळे,सुमित गरुड, ललित भांबेरे, साहिल जाधव यांनी परिश्रम घेतले.

शरद शेजवळ
निमंत्रक,प्रवर्तक
मुक्ती महोत्सव समिती,मुक्ती महोत्सव मुक्तीभूमी येवला
9822645706

Previous articleमातंग समाजातील युवकांनी व्यवसायाकडे वळावे..:- ज्ञानदेवराव मानवतकर
Next articleपत्रकारांना धमकी देणाऱ्यास होणार दंड ५०,०००/-, ३ वर्षांपर्यंत तुरुंगवासही होऊ शकतो.