Home Breaking News हिमायतनगरचे नवनिर्वाचित पोलिस निरीक्षक भुसनर रूजु.

हिमायतनगरचे नवनिर्वाचित पोलिस निरीक्षक भुसनर रूजु.

मारोती अक्कलवाड पा. पाटील.
जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड
दिनांक – 01 मे 2022

हिमायतनगर मावळते पोलिस निरीक्षक भगवान कांबळे साहेबांचा 31 मे रोजी शासकीय नियमानुसार वयाच्या 58 वया वर्षी ते सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा कार्यकाळ अतिशय चांगला गेला. म्हणून जनतेनी त्याची शहरातुन परीवासहित मिरवणूक काढली. आणि निरोप समारंभ थाटात पार पडला. त्यामुळे सर्व जनतेनी त्यांना भावनीक होऊन त्यांच्या कार्याची स्तुतीसुमने उधळली आहेत. अतिशय लोकप्रिय पोलिस निरीक्षक म्हणून त्यांनी ख्याती होती. अनेक गरजु दिव्यांगांना सनाच्या दिवशी किराणा सामान, गरजुना कपडे देऊन, एक उत्तम आदर्श त्यांनी निर्माण केला आहे.
सवना ज. येथील एका दिव्यांग कुंटुंबांना त्यांनी किराणा सामान घेऊन दिले. त्या कुटुंबाला मी स्वतः सवना येथुन हिमायतनगर येथे घेऊन गेलो होतो. पोलिस म्हटलं की अगोदर लोकांना भिती वाटायची पण साहेबांचा स्वभावच असा होता. दुरवरची माणस जवळ येयाची. हे एक सामाजिक कार्य त्यांच्या हातुन नेहमीच घडायचे.. विशेषत: त्यांनी कुठलीही प्रसिद्धी न करता हे विशेष आहे.
त्यांच्या जागी हिमायतनगर चे नवनिर्वाचित पोलिस निरीक्षक म्हणून भुसनर साहेब हे रुजु झाले आहेत.
हिमायतनगर तालुक्यातील दारुबंदी, मटका, खुनाचे प्रकरण, दरोडा आदि समस्यांनी गेल्या काही दिवसांपासून डोके वर काढले आहे. नवनिर्वाचित पोलिस निरीक्षक साहेबांसमोर हे निश्चित आव्हान असणार आहे. ते कसे पेलणार यावरही अवलंबून आहे. नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक भुसनर साहेबांचे अनेकांनी स्वागत केले आहे.

Previous article” जगावेगळी ममता “
Next articleडिझेल साठी पंपावर रांगाच रांगा..