Home Breaking News हेमंत शिंदे यांचे गोदाप्रतिष्ठान च्या वतीने वाढदिवसा निमित्त अभिष्टचिंतन

हेमंत शिंदे यांचे गोदाप्रतिष्ठान च्या वतीने वाढदिवसा निमित्त अभिष्टचिंतन

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़ मो. नंबर – 8983319070

गोदामाई प्रतिष्ठान च्या वतीने रविवार दि.9 एप्रिल रोजी “स्वच्छता अभियान”चा 47 वा आठवड़ा हा गोदावरी आईची स्वच्छता करुन हा उपक्रम राबावि न्यात आला. यावेळी गोदावरी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. आदिनाथज़ी ढाकणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून हेमंत शिंदे यांचे वाढदिवसा निमित्त अभिष्टचिंतन करण्यात आले. नाशिक गोदावरी प्रतिष्ठान ची नाशिक कार्यकारी अध्यक्ष सृष्टी देव हिने गोदा स्वच्छतेची शपथ सर्वाना दिली.
यावेळी धामणी ग्रामपंचायत च्या उपसरपंच सैा. रंजनाताई लाड़, नाथपंथी समाज संघटनेचे सचिव व शिक्षक भारती चे जिल्हा कार्यवाह श्री. विनायकज़ी लाड़, गोदा प्रतिष्ठानची नाशिक कार्याध्यक्ष सृष्टी देव, गोदा प्रतिष्ठानचे आबासाहेब देव, श्री. दत्तात्रय कोठावदे, शेखर ढेपे, प्रफुल्लचंद्र काळे, योगेश शेजवळ, आतिश दाणी, निलेश राउत, मयूर गायकवाड, भूषण सिनकर, सैा. जयश्री सिनकर, नरेंद्र पनशीकर, संकेत शिंदे, ऋषिकेश डापसे, कु. सरिता परदेशी, विजयज़ी काकड़, चि. प्रसाद लाड़, कु. गैारी देव, चि. दिव्यांशू सिनकर आदि प्रमुख पाहुणे, गोदामाई सेवक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करतांना हेमंत शिंदे यांनी गोदावरी प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले व राबाविण्यात येणाऱ्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. वाढदिवसा निमित्त गोदाप्रतिष्ठानने अभिष्टचिंतन केल्या बद्दल आभार मानले.

Previous articleक्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा
Next articleहिरण्यगर्भ सिरंजनी केसरी कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन्न..