संदिप देवचे ग्रामीण पत्रकार
9860426674
जलंब (प्रतिनिधी) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी सुमारे १०० वर्षापुर्वी २७ सप्टेंबर १९२५ रोजी केली असुन रा.स्व.संघाच्या शताब्दी वर्षाची सुरूवात विजयादशमी २ ऑक्टोबर पासुन झाली आहे. या अनुषंगाने जलंब येथील छत्रपती शिवाजी चौक जलंब मंडलचा विजयादशमी शस्त्रपुजन उत्सव व पथसंचलन संघाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त जलंब येथे आयोजित पथसंचलनामध्ये शाळकरी विद्यार्थ्यां व गावातील स्वयंसेवकाचा उत्साह आणि आनंद पाहण्यासारखा ठरला. या कार्यक्रमात विद्यार्थी स्वयंसेवकांच्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले, ज्यामुळे गावात उत्साहाची लाट निर्माण झाली. पथसंचलन च्या वेळी संघाची शिस्थ व गणवेश दंड विशेष लक्षवेधी ठरले की,. गावकर्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची झळाळी उमटली. उपस्थितांना हा क्षण अत्यंत मनोहर आणी प्रेरणादायी वाटला. संपुर्ण गावात रांगोळ्या ठीक ठीकानी फुलांचा वर्षाव फटाके चौका चौकात फोटोशूटने कार्यक्रमाच्या उर्जेत आणि उत्साहात आणखी भर टाकली.या प्रेरणादायी कार्यक्रमाने गावातील युवकांमध्ये सामाजिक बांधिलकी आणि देशभक्तीची ज्वाला पेटवली.गावातील प्रमुख मार्गावरून स्वयंसेवकाचे गणवेशात व दंडासह भव्य पथसंचलन रविवार १२ऑक्टोबर २५ रोजी सायंकाळी ५.३०.ला छत्रपती शिवाजी महाराज चौक येथुन काढण्यात आले कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणुन जलंब येथील राधेशामजी चौधरी जेश्ट नागरिकांनी तथा जेश्ट स्वयंसेवक व प्रमुख वक्ते- म्हणुन संतोषजी पंजाबराव देशमुख खामगाव तालुक्का संघ चालक तसेच जलंब पहुरजिरा कुरखेड माटरगाव खामगाव येथील स्वयंसेवक व गावातील मंडळी जलंब पोलीस स्टाफ उपस्थित होते कार्यरक्रमाचे प्रास्ताविक व आभार अमोल काळे सर यांनी केले



