हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्युज मो. नंबर – 8983319070
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या टी ईटी सक्तीच्या निर्णयाच्या विरोधात राज्यातील सर्व शाळा मधील शिक्षक रस्त्यावर उतरले होते. सर्व शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यास विलंब करत असल्याचा तीव्र निषेध करत शिक्षकांनी 9 डिसेंबर पासून आंदोलनाचा इशारा दिला.
20 विविध संघटना 8 हजाराहून अधिक शिक्षक मुख्या ध्यापक मोर्च्यात सहभागी झाल्याचा दावा शिक्षकांनी केला. मोर्चात माध्यमिक शिक्षक, शिक्षक मनसे सेना, मुख्याध्यापक टिडीएफ, पदवीधर, आदिवासी शिक्षक, प्राथमिक शिक्षक संघ, अन्य शासकीय निम शासकीय संघटना सहभागी झाल्या होत्या.
हेमंत शिंदे
( अध्यक्ष )
महाराष्ट्र राज्य भटके विमुक्त ओबीसी महासंघ
टिईटी सक्तीचा निर्णय हा शिक्षकांवर अन्याय करणारा आहे. या तुघलकी निर्णया मुळे अनेक शिक्षकांचे आयुष्य देशोधडिला लागणार आहे. शिक्षक भरती करिता घेण्यात येणाऱ्या टैट परीक्षे करिता व्हिजेएनटी प्रवर्गावर अन्याय करीत त्यांना ओपन वर्गात दाखववून अन्यायकारक पद्धतीने वाढीव शुल्क आकरनी च्या अन्यायाचा जीआर रद्द करण्याचा काम आमच्या संघटने वतीने करण्यात आले. त्याच प्रमाणे नाशिक महानगर पालिकेतील 7 वर्षां पासून रद्द झालेल्या शिक्षकभरती मधील 1200 शिक्षक उमेदवारांचे शुल्क परत मिळवुन देण्याची लढाई असो या मध्ये आमची संघटना नेह मीच शिक्षकांच्या बाजुने लढली आहे.
या टीईटी विरोधातील शिक्षकांच्या लढ्याला आमच्या संघटनेचा पूर्ण पाठींबा आहे. आमची संघटना शिक्षकांच्या खांदयाला खांदा लावून या लढ्यात उतरेल व त्यांना न्याय देण्याकरिता लडेल याची मी ग्वाही देतो.



