हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा राजा न्युज मो. नंबर – 8983319070
पंचवटी, नाशिक येथील रामकुंड प्रतिनिधी (नाशिक पंचवटी )
परिसरातील ऐतिहासिक **अहिल्या घाट** प्रशासनाकडून नव्याने बांधण्यात येत असून, सुस्थितीत असलेला जुना घाट पाडून त्याऐवजी सिमेंटचे नवीन बांधकाम करण्यात येत आहे. या कृतीमुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी उभारलेल्या ऐतिहासिक वास्तू, घाट व मंदिरांचा वारसा नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे.
कुंभमेळ्याच्या तयारीच्या नावाखाली ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जपण्याऐवजी तो पुसून टाकण्याचे काम सुरू असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. यासंदर्भात विविध सामाजिक संघटना, हिंदू धर्मरक्षक संघटना तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समितीच्या वतीने अनेक वेळा आंदोलन व निवेदने देण्यात आली. मात्र प्रशासन व शासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
यापूर्वी या घाटाला **”पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट”** असे नामकरण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. तसेच या परिसरात भव्य **”अहिल्यासृष्टी”** उभारण्याचे आश्वासनही देण्यात आले होते. परंतु आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, याबद्दल समाजामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा ऐतिहासिक वारसा जतन करण्याऐवजी तो नष्ट करण्याच्या प्रशासनाच्या भूमिकेचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. संबंधित काम तात्काळ थांबवून वारसा संवर्धनाच्या दृष्टीने योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
अन्यथा येत्या काळात सर्व समाजबांधव, वारसा संवर्धन प्रेमी आणि विविध संघटनांच्या सहभागातून व्यापक व तीव्र आंदोलन उभारण्यात येईल. याची संपूर्ण जबाबदारी प्रशासन व शासनाची राहील. असे समिती अध्यक्ष समाधान बागल यांनी केले आहे
हिंदू धर्म रक्षक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समिती, नाशिक** अध्यक्ष ….. समाधान बागल




