जिल्हा संपादक नांदेड दिनांक – 01 मार्च 2023
संबध महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध असलेली हिमायतनगर येथील, श्रीक्षेत्र परमेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी यात्रेचे आयोजन करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांच्या भाषण स्पर्धा, कबड्डी, कुस्ती आदी स्पर्धेसहित विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये कबड्डी स्पर्धेला सुरुवात झाली आहे. मुंबई, नांदेड, यवतमाळ, लातुर, हिंगोली, आदी जिल्ह्यांतील खेळाडू या स्पर्धेत भाग घेत आहेत. विदर्भ आणि तेलंगणा राज्यातुन खेळाडू यामध्ये भाग घेत असतात. मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महाविरशेठ श्रीश्रीमाळ यांच्यासह , संजय माने आणि अनेक सदस्य उपस्थित होते. या सामन्याचे पंच म्हणून ताडेवाड साहेब, बोडावार साहेब, सोनबाजी राऊत सवनेकर, शेनेवाड सर, राठोड दरेसरसमकर, गजानन ताडकुले, पापा पारडीकर, संचालक सुर्यवंशी, वानखेडे, देशपांडे आदी यात्रा कमेटीचे सदस्य व प्रेक्षक उपस्थित होते.