जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 17 जुन 2024
अन्न, वस्त्र निवारा सोबतच विज हि नितांत गरज लागणारी बाब आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून हिमायतनगर तालुक्यातील मौजे सवना ज. सहीत रमणवाडी, वाशी, चिंचोरडी , एकघरी, मादापुर, जिरोणा, दगडवाडी, गणेशवाडी येथील विज रात्रीला पाऊस पडला की लगेच गुल होत आहे. हे वास्तव चित्र तालुक्यातील अनेक गावात वाहवयास मिळत आहे. 16 जुन रात्र थोडासा पाऊस आला आणि रात्रभर विज गेली ती सकाळीच आली. पावसाळ्याचे दिवस असल्याने विंचु, साप रात्रीबेरात्री निघत आहेत. आपल्या चिमुकल्यासोबत जिव मुठीत धरून उघड्यावर हवेला नागरीक झोपत आहेत. शहरी भागात एक मिनिट लाईट जात नाही. परंतु ग्रामीण भागात असा अंधार का? असे सुजाण नागरिक महावितरण कंपनीला विचारत आहेत. वेळीच रात्रीला जाणारी विजेचा प्रश्न सोडवा नाहीतर मुलं…बाळ घेऊन नागरीक महावितरण कंपनीच्या कार्यालयात जाऊन रात्रीला तेथेच रात्र काढण्याचं अनोखं आंदोलन उभे करणार असल्याची माहिती तरुण वर्गासह जेष्ठ नागरिकांनी महावितरण कंपनीला दिला आहे.