Home Breaking News जलंब पाई वि‌द्यालयात 2004/05 च्या माजी विद्यार्थीचे सम्मेलन मोठ्या उत्साहात संपन्न 

जलंब पाई वि‌द्यालयात 2004/05 च्या माजी विद्यार्थीचे सम्मेलन मोठ्या उत्साहात संपन्न 

ग्रामीण पत्रकार संदिप देवचे 9860426674

जलंब:सन 2004-05 च्या माजी विद्यार्थी स्नेहसंमेलनाचे आयोजन वीस वर्षानंतर श्री पायी विद्यालय जलंब या ठिकाणी करण्यात आले होते प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात काय करत आहे याची ओळख व्हावी सर्व मित्रांचे आणि मैत्रिणींची भेट व्हावी व प्रत्येक जण आयुष्य जगत असताना एकमेकांच्या संपर्कात राहावं व एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हावं त्याचप्रमाणे शिक्षकांचे विद्यार्थ्यांच्या जीवनातील योगदान या कार्याचे कुठेतरी कौतुक व्हावं या उद्देशाने दिनांक 18 एप्रिल 2025 रोजी श्रीपायी विद्यालय जलम या ठिकाणी सन 2004 2005 या वर्षातील इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते तर प्रसंगी इसवी सन 2005 च्या सर्व विद्यार्थ्यांना व कार्यरत सर्व शिक्षकांना कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले होते श्री पाई विद्यालय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय विजय कुमारची राठी यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते माजी विद्यार्थी स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमांमध्ये सर्व जुन्या आठवणीवर उजाळा देत आपले मनोगत व्यक्त करण्यात तसेच सन 2004-05- या वर्षात दिवंगत झालेले शिक्षक व विद्यार्थी यांना आदरपूर्वक आदरांजली अर्पण करण्यात आली त्याचप्रमाणे त्या वर्षांमध्ये सोबत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी दिवंगत झालेल्या विद्यार्थ्याच्या परिवारास माजी विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करत समाजासमोर एक वेगळा आदर्श उभा केला त्याचप्रमाणे ज्या शाळेने आपल्याला आपल्या पायावर उभा राहणं शिकवलं त्या शाळेतील शिक्षकांसाठी त्या शाळेसाठी गुरुदक्षिणा म्हणून सुद्धा विद्यार्थ्यांनी आर्थिक मदत केली सदर वर्षातील एकूण 113 विद्यार्थ्यांपैकी आज रोजी 14 विद्यार्थी शासकीय सेवेत कार्य करीत असल्यामुळे अशा सर्व विद्यार्थ्यांचा गौरव त्या ठिकाणी करण्यात आला त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये करीत असलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी सन्मान करण्यात आला व तसेच साडेतीन सर्व कार्यरत शिक्षकांचा सुद्धा व माजी शिक्षकांचा सुद्धा गौरव सन्मानचिन्ह शाल श्रीफळ देऊन व भेटवस्तू देऊन करण्यात आला. आजच्या या युगामध्ये दिवंगत झालेल्या परिवारास आर्थिक मदत करणे ही आजच्या तरुण पिढीसाठी व समाजासाठी एक प्रेरणादायी उपक्रम राबवून एक समाजासमोर आदर्श देण्याचं कार्य श्रीपायी विद्यालयाच्या इयत्ता दहावीच्या सन २००४-५ च्या माजी विद्यार्थ्यांनी केलं त्यांचं करावं तेवढं कौतुक करणे सदर कार्यक्रमाचे आयोजन हे इयत्ता दहावीचे सन 2004 500 सर्व विद्यार्थ्यांनी केलेले असून सदर कार्यक्रम प्रसंगी सन्माननीय श्री नागडे सर श्री सन्माननीय सोनटक्के सर श्री सन्माननीय देशमुख सर सन्माननीय संगीता चव्हाण मॅडम व श्री चव्हाण सर यांनी आपले मनोगत तातून सदर विद्यार्थ्यांच्या आयोजनाचे व राबवत असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले या उपक्रमामध्ये वैशाली सोनकुवर शरद मोहे लता तांदूळ कार त्याचप्रमाणे पंकज मांडवाले शेख सलीम शेख मोसिन यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच सूत्रसंचालन श्री प्रदीप डाबेराव सर यांनी केलेले असून आभार प्रदर्शन सुरज राजपूत यांनी केले

Previous articleनदगांव तांडा येथे पाणीटंचाई.
Next articleगोदावरी प्रतिष्ठाण नाशिक च्या गोदा स्वच्छता अभियाणाच्या 154 आठवडा प्रसंगी 27 गोदा सेवकांनी काढला तब्बल 1000 किलो कचरा