Home Breaking News शेतक-यांनी फळबाग लागवड करावी..

शेतक-यांनी फळबाग लागवड करावी..

👉 जिल्हाधिकारी कर्डिले यांचे आव्हान ..

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 24 जुन 2025

नांदेड जिल्हयाचे जिल्हाधिकारी यांनी आपल्या हिमायतनगर तालुक्याचा दौरा करीत हिमायतनगर सेवा सहकारी सोसायटीच्या गोदामाचे भुमीपुजन केले. यावेळी मा. आमदार माधवराव पाटील जवळगावकर उपस्थीत होते.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी मौजे एकघरी ग्रामपंचायत येथील कार्यक्रमाला उपस्थीतांना आदिवासी योजनेविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी हिमायतनगर येथील शेतातील राजलक्ष्मी ड्रॅगन फुड फॉर्मला भेट दिली. तब्बल विस एकरवर ड्रॅगन फुड या फळपिकांची लागवड केली आहे. या ड्रॅगन फुडला भेट दिली. त्यावेळी त्यांनी उपस्थीत शेतक-यांना मार्शदर्शन करतांना ते म्हणाले शेतकरी बांधवांनी पारंपारीक पिके न घेता फळबागची लागवड करुन आपले आर्थीक उत्पन्न वाढवावे. असेही ते म्हणाले. यावेळी हिमायतनगरच्या तहसिलदार पल्लवीताई टेमकर, शेतमालक तथा भाजपाचे नेते गजानन तुप्तेवार, बाळुअण्णा चवरे, धनंजय तुप्तेवार, शे. मोईन उपस्थीत होते.

Previous articleहिमायतनगर उ.बा.ठा. गटाच्या शिवसेना तालुकाप्रमुख पदी संजय काईतवाड यांची निवड…..
Next articleमहसुल प्रशासनाची दमदार कारवाई* अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक करणारे ३ ट्रॅक्टर पकडले…