Home Breaking News कृषी संस्कृतीचा सण *नागपंचमी*

कृषी संस्कृतीचा सण *नागपंचमी*

दिनांक 29/07/2025 कल्याण वानखेडे तालुका प्रतिनिधी 

हिमायतनगर *श्रावण शुद्ध पंचमीचा दिवस नागपंचमी (Nag Panchami 2025)म्हणून साजरा केला जातो.*

यंदा २९ जुलै या दिवशी नागपंचमी आली आहे..

निर्सगातल्या सर्व शक्तीची आणि घटकांची पूजा करणारा आपला हिंदू धर्म आहे. प्रत्येक पशु, पक्ष्याला महत्व देत भूतदयेचा उत्कृष्ट संस्कार शिकविणारी आपली हिंदू संस्कृती आहे.

आपल्या परंपरेतील एक सण म्हणजे ‘नागपंचमी… 🐍 श्रीकृष्णाने कालियामर्दन केले तो हा दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो. आपल्या कृषीप्रधान देशात शेतकरी मित्र म्हणून सापांचे विशेष स्थान आहे. पिकांचे संरक्षण करणारा घटक असलेल्या नागाची परोपकाराच्या भावनेने पूजा करून नागपंचमीला त्यांचा सन्मान केला जातो.

प्रत्येक जीव हा निसर्गाचा अविभाज्य भाग असून निसर्गचक्रातही त्याचे महत्त्व असते हा संदेश देणार्‍या नागपंचमी सणाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा…

आपल्या शेतकऱ्यांची नांगर संकृती होती ते शेतीवरच आधारलेली होती..

आर्य संस्कृती मुळे हि संकृती झाकली गेली आहे….

*या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरट करत नाही, खोदत ही नाहीत* ?

याबद्दल एक कथा प्रचलित आहे. ती म्हणजे एकदा एक शेतकरी शेतात नांगरट करत असताना त्याच्याकडून नागिनीची तीन पिल्ले चुकून मृत्युमुखी पडतात व नागिन चिडते व त्याला चावायला लागते, तेव्हा शेतकऱ्याची बायको त्या नागिनीची माफी मागते तिची पूजा करते. नागिन शेतकऱ्याला माफ करते. असा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरट करत नाही, खोदत ही नाहीत व महिला या नागाची पूजा करतात. नागपंचमीच्या दिवशी महिला नटून-थटून नागदेवतेची पूजा करण्यासाठी वारुळाला जातात. तिथे वारुळाला दूध, साळीच्या लाह्यांचा नैवेद्य दाखवतात. पण काही गावातून मात्र अजूनही जिवंत नागाची पूजा करतात. त्याला दूध पाजतात. पण दुधामुळे हि नागांना त्रास होतो हे आता शास्त्रीय दृष्टीने सिद्ध झाले आहे.

नागपंचमीच्या दिवशी* नागदेवतांचे स्मरण आणि पूजा केली जाते. या दिवशी घराच्या दारात ८ नागांच्या आकृती बनवण्याची परंपरा आहे. हळद, रोळी, अक्षता आणि फुले अर्पण करून नागदेवतेची पूजा करावी. कच्च्या दुधात तूप आणि साखर मिसळल्यानंतर नागदेवाचे स्मरण करून त्याला ते अर्पण करावे. आपल्या गावांमध्ये घरोघरी नागदेवतेची पूजा करत नागपंचमी साजरी केली जाते.🌹🙏

Previous articleकु. सृष्टी देव हिला नाशिक स्मार्ट सिटीझन अवॉर्ड प्रदान
Next articleहिमायतनगर येथील प्रसिद्ध व्यापारी श्यामजी मारूडवार यांनी श्रीक्षेत्र परमेश्वर मंदिराला आसनखुर्चीची दिली देणगी.