Home Breaking News पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांची खरीप पिके धोक्यात…..

पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांची खरीप पिके धोक्यात…..

शेतकरी राजा पावसाच्या प्रतीक्षेत……

भूमीराजा न्यूज हिमायतनगर शहर प्रतिनिधी,
कृष्णा राठोड – ९१४५०४३२८१

हिमायतनगर /-
तालुक्यातील बोरगडी, बोरगडी तांडा,धानोरा, वारंगटाकळी,कोठा, कोठा ( ज ), मंगरूळ, सिबदरा, कारला, खडकी, सरसम, पोटा, दाबदारी, सोनारी, जवळगाव, आदी सर्कल मधील खरीप हंगामातील पिके सोयाबीन, कापूस, उडीद, मूग पावसाने दडी मारल्यामुळे सोयाबीन पीक धोक्यात असल्याचे दिसत आहे.
मृग नक्षत्रात पाऊस समाधानकारक पडल्यामुळे पेरणी वेळेवर झाली. पण त्यानंतर सतत पाऊस पडल्यामुळे अतिवृष्टीजन्य पूरस्थिती निर्माण झाली.काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले होते. नदी -नाल्याच्या काठावरील शेतीपिकांचे सोयाबीन, कापूस आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले.
आता पंधरा ते वीस दिवस पावसाने उगाडी दिल्यामुळे सोयाबीन कापूस आदी पिक शेतकऱ्यांच्या हातात आलेले पीक सुखून हातातून जाण्याची शक्यता सध्या तरी पाहवयास मिळत आहे. यामुळे या परिसरातील शेतकरी अतीचिंतेत दिसत आहेत.
आज जगाचा पोशिंदा शेतकरी राजा संकटात आहे प्रशासनाने सरसकट दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान देण्यात यावे अशी शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.

Previous articleखडकी ( बा) तांडा येथे पोळा सण नाईक अनिल पवार कारभारी साहेबराव जाधव मोट्या उत्साहात साजरा……..
Next articleगोदामाई प्रतिष्ठान च्या वतीने नदी स्वच्छता अभियानाचा 18 वा आठवडा