बाळापुर प्रतिनिधी
आज दिनांक 8 ऑगस्ट 2025 रोजी मा. तहसीलदार, बाळापूर, जि. अकोला यांना बाळापूर तालुका पत्रकार संघटना यांचा कडून निवेदन सादर दैनिक सुफ्फाचे संपादक सञ्जाद हुसेन व त्यांच्या कुटूंबीयावर झालेल्या हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाई करणे साठी आज बाळापूर पत्रकार संघ यांच्या तर्फेविनंतीपूर्वक निवेदन सादर केले
मंगळवार दि.२९ जुलै २०२५ रोजी अकोला जिल्हा पोलीस विभागाच्या अधिकृत प्रेस नोटच्या आधारे दैनिक सुफ्फाने पोलिस च्या ऑपरेशन प्रहार मोहिमेचे कौतुक करत बातमी प्रसिद्ध केली होती. मात्र, याच बातमीच्या निषेधार्थ संबंधित गुन्हेगारांनी दैनिक सुफ्फाचे कार्यालयात येऊन, मुख्य संपादक सजाद हुरोन व त्यांच्या कुटुंबीय व सहकाऱ्यांवर तलवार, चाकू, भाल्यांनी जीवघेणा हल्ला केला.
या घटनेत चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या गंभीर प्रकरणाची सर्व पत्रकार संघटनांतर्फे तसेच बाळापूर तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने तीव्र शब्दात निंदा करण्यात येत आहे. तसेच सदर प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन त्वरीत व कडक कारवाई करण्यात यावी .आणि
आमच्या मागण्या पुढीलप्रमाणे ::-कार्यालयका प्रकरणातील संबंधित आरोपींवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. २. पत्रकारांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना राबवण्यात याव्यात. निवेदन देताना सर्व तालुक्यातील पत्रकार बंधू उपास्थित होते



