Home Breaking News पेरकेवाड समाजाने संघटीत होणे काळाची गरज.* *से.नि.मु.अ. एन. के. अक्कलवाड सर...

पेरकेवाड समाजाने संघटीत होणे काळाची गरज.* *से.नि.मु.अ. एन. के. अक्कलवाड सर यांचे प्रतिपादण.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 14 आॅगस्ट 2025

हिमायतनगर येथील महात्मा ज्योतीबा फुले सभागृहामध्ये पेरकेवाड समाज बांधवांची बैठक संपन्न झाली.
भोकर येथे आयोजित 26 आॅक्टोबर रोजी गणराज मंगल कार्यालय येथे पेरकेवाड समाजाचा परिचय मेळावा, दहावी व बारावी परीक्षेमध्ये 80% गुण किंवा त्यापैक्षा अधिक गुणवंत विद्यार्थयांचा सत्कार करण्यात येणार आहे. विविध क्षेत्रात प्रगती करणा-या मान्यवरांचा सत्कार केला जाणार आहे. या कार्यक्रमांचा संपुर्ण खर्च शासकीय गुत्तेदार गोविंदराव उल्लेवाड यांनी उचलला आहे. आपला पेरकेवाड समाजाची प्रगती व्हावी. आपण समाजाचे देणे लागतो.या उदात्त हेतुने त्यांनी २६ आॅक्टोबर मध्ये मेळाव्याचे नियोजन केले आहे. त्या दृष्टीकोणातुन अगोदर भोकर, मुखेड, हिमायतनगर, हदगाव, बिलोली येथे बैठकीचे आयोजन केले आहे. हिमायतनगर येथील कार्यक्रमाचे अध्यक्ष समाज भुषण, सेवा निवृत्त मुख्याध्यापक नागनाथ राव अक्कलवाड सर हे होते. यावेळी अध्यक्षीय समारोप करतांना आपला पेरकेवाड समाज हा अल्पसंख्याक समाज आहे. मी आणी माझे मेव्हुणे कोंडबाराव सिंगणवाडसर जेंव्हा नोकरीला लागलो. तेंव्हा ज्या ज्या गावात पेरकेवाड समाज राहतो. तिथे जाऊन मिटींग घेत होतो.आणी समाज संघटीत करण्याचे काम करत गेलो. हि समाज संघटीत करण्याची चववळ आजतागायत चालु आहे. त्यामुळे मला मनस्वी आनंद होत आहे. या स्पर्धेच्या युगात आपला समाज संघटीत होणे काळाजी आहे.कारण काळ झपाट्याने पुढे जात आहे. तंत्रज्ञानचं युग आलेलं आहे असेही ते म्हणाले..
यावेळी नियोजित भोकर येथील पेरकेवाड समाज मेळाव्याचे संयोजक तथा शासकीय गुत्तेदार गोविंदराव उल्लेवाड साहेब, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त संभाजीराव आलेवाड सर, प्रकाशजी बच्चेवार , शाखा व्यवस्थापक सुब्बनवाड साहेब, सुब्बणवाड सर, माजी अध्यक्ष गजानन तिप्पनवार, परमेश्वर तिप्पनवार, अॅड. तुकाराम जी पन्नसवाड, राजेश सिंगणवाड, सहायक पोलीस निरीक्षक राजेश डाकेवाड, अशोकराव अनगुलवार , आनंदराव मुतनेपवाड, टेंभी येथील तंटामुक्ती अध्यक्ष संभाजी अक्कलवाड , पत्रकार मारोती अक्कलवाड आधीची समायोचित भाषणे झाली.यावेळी माजी सरपंच बालाजी उल्लेवाड, बंडु अनगुलवार, सहशिक्षक सतिष गोपतवाड, रामदास फेदेवाड, आनंद संगणवाड, गणपत पुजरवाड , गणेश अक्कलवाड, दत्ता अक्कलवाड, सुब्बनवाड, आलेवाड, संगणवाड, गोपेवाड, बुध्देवाड, दासरवाड, किनवटवरुन आलेले सहशिक्षक आदी तालुक्यातील पेरकेवाड समाज बांधव यावेळी उपस्थीत होते..

Previous articleसहस्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी महाएल्गार सभाचे सिरपल्ली येथे आयोजन..
Next articleनांदेड विभागात ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत तिरंगा बाईक व सायकल रॅली चे आयोजन ..