31 ऑगस्ट ” भटके विमुक्त दिवस ” नाशिक मध्ये साजरा करण्यास नकार देणाऱ्या सहाय्यक संचालकास कार्यक्रम घेण्यास पाडले भाग
हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्युज, महाराष्ट्र राज्य मो. नंबर – 8983319070
महाराष्ट्र शासनाने 31 ऑगस्ट हा दिवस ” भटके विमुक्त दिवस ” म्हणुन साजरा करण्यास मान्यता दिली आहे. त्या अनुषंगाने हा दिवस साजरा करण्यासाठी विशेष आर्थिक तरतुद केल्या बाबतचा एक जी. आर. महाराष्ट्र शासनाने 31 जुलै 2025 रोजी जारी केला होता. त्या जी. आर. चा संदर्भ देत ” भटके विमुक्त दिवस ” साजरा करण्या बाबतचे पत्र दि. 4-8-2025 रोजी संतोष चव्हाण, साहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, नाशिक यांना प्रत्येक्ष भेटून देण्यात आले.
सुरवाती पासूनच नकारात्मक भुमिका घेऊन निधी उपलब्ध नसल्याचे कारण देत या महाशयांनी कार्यक्रम घेण्यास नकार दिला. तरी पण सातत्याने त्यांना या बाबतीत विचारना करण्यात आली. व निधीची उपलब्धी होण्या बाबत इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडे काय पाठपुरावा केला याबाबत जाब विचारला.
शासनाच्या जी. आर. मध्ये ” भटके विमुक्त दिवस ” हा राज्यस्तरावर व जिल्हा स्तरावर साजरा करण्या बाबतचे स्पष्ट निर्देश असतांना हा दिवस आदिवासी बहुल डांग सैदाणे या ठिकाणी घेण्याचा अजब निर्णय त्यांनी घेतला.
हेमंत शिंदे, अध्यक्ष – महाराष्ट्र राज्य भटके विमुक्त जाती जमाती महासंघ यांनी या निर्णयास कडाडून विरोध केला व हा दिवस नाशिक मध्येच साजरा करावा असे त्यांना खडसावून सांगितले.
हेमंत शिंदे व मयुर गऊल यांनी सातत्याने 30 दिवस केलेल्या संघर्षाला यश येऊन ” भटके विमुक्त दिन ” 31 ला नाशिक येथील समाज कल्याण विभागाच्या सामाजिक न्याय भवन, बी विंग, नासर्डी पुला जवळ येथे कार्यक्रम घेण्यास सहाय्यक संचालक संतोष चव्हाण यांना घेण्यास भाग पाडले.
या कार्यक्रमात भटक्या विमुक्त समाजाच्या संस्कृतीचे जीवनमूल्य, परंपरा दर्शविणारे विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व माहितीपर उपक्रम तसेच गुणवंत विध्यार्थीना प्रमाणपत्र व पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
हेमंत शिंदे यांनी दिलेल्या या लढ्याला यश आल्या बद्दल समस्त भटके विमुक्त जाती जमातीच्या समाज बांधवांनी हेमंत शिंदे यांचे अभिनंदन केले आहे.
प्रतिक्रिया :-हेमंत शिंदे(अध्यक्ष)महाराष्ट्र राज्य भटके विमुक्त जाती जमाती महासंघ
महाराष्ट्र राज्य भटके विमुक्त ओबीसी च्या कल्याणा करिता अनेक योजना राबवित असते. परंतु अपप्रवृत्ती असलेले असे काही अधिकारी झारीतल्या शुक्रचार्याची नकारात्मक भूमिका पार पाडत असतात. व वंचित उपेंक्षित असलेल्या समाजाच्या उन्नतीला बाधा निर्माण करीत असतात. अशा मुजोर अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्याचे काम यापुर्वी देखील काही प्रकरणात केलेले आहे. त्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या शिक्षक भरती मध्ये भटके विमुक्ताना अन्याय कारक रीतीने खुल्या वर्गात टाकून त्यांच्या कडून वाढीव आर्थिक शुल्क वसुल करणाऱ्या मंत्रालयातील अधिकारी व नाशिक मधील महानगर पालिकेतील शिक्षण विभागातील भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्याच्या बाबतीत केलेले आहे.
यापुढे ही समाज कल्याण विभागातील अशा मुजोर व अडेलतट्टू व भ्रष्टचारी अधिकाऱ्यांना जाब विचारून त्यांची तक्रार मंत्रालय स्तरावर मुख्यमंत्री व सचिव यांच्याकडे करून त्यांना वठणीवर आणण्यात येईल.



