Home Breaking News लोहारा येथील नागरिकांचे पाण्यासाठी हाहाकार

लोहारा येथील नागरिकांचे पाण्यासाठी हाहाकार

लोहारा:-  अकोला जिल्ह्य़ातील व बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील मागील कित्येक महिन्यापासून पाण्यासाठी नागरिक वणवण भटकत आहेत .तरी याकडे ग्रामपंचायत व संबंधित अधिकारी पाणीटंचाई कडे लक्ष देतील का.आता दहावीतील मुलांची परीक्षा चालू आहे घरात पिण्यासाठी पाणी नसल्यामुळे या मुलांना पाणी भरण्यासाठी आपल्या पुस्तकाला दुर ठेवून अगोदर पिण्यासाठी पाणी आणावे लागते. त्यामुळे या मुलांचे शिक्षणाचे नुकसान होत आहे.या मुलांचे शिक्षणाचे नुकसान झाल्यास याला जबाबदार कोण.

प्रशासन सुस्त   उपाययोजना शून्य, गावातील विहिरी पडल्या कोरड्या पडल्या आहेत.  बाळापूर तालुक्यातील लोहारा येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी महिलांना,लहान मुलांना, वणवण भटकावे लागत आहे. परिणामी महिलांमध्ये असंतोष पसरला आहे. पाण्याची पातळी खोल गेल्याने लोहारा येथील संपूर्ण विहिरी कोरड्या पडलेल्या आहेत तसेच मन नदी सुध्दा  कोरडी  झाली  आहे. पाण्याची पातळी खोल गेल्याने पाण्यासाठी दूरवर जावे लागत आहे. भर उन्हामध्ये शेतातील विहिरीचे पाणी आणावे लागत आहे.   गावामध्ये चार हातपंप आहेत. त्यापैकी एक हातपंप मार्च महिन्यापूर्वीच पाण्याअभावी बंद पडला तर दुसरी हातपंप येत्या दोन ते चार दिवसात बंद पडण्याच्या मार्गावर आहे. लोहारा येथे  सतत पाणीटंचाई भासत आहे. पाणी टंचाईवर पाहिजे त्या प्रमाणात प्रशासनाकडून उपाययोजना केली गेली नाही. मार्च महिन्यापासून पाण्याची भीषण टंचाई भासत आहे. एप्रिल, मे आणि जून महिना शिल्लक आहे. लोहारा गावाची लोकसंख्या आठ हजाराच्या वर असून गावामध्ये शेतकऱ्यांच्या विहिरी आहेत.ग्रामपंचायत  यांची विहीर आहे .  पाण्याची पातळी खोल गेल्याने ती बंद पडली आहे .गावकऱ्यांना पिण्याचे पाणी सुद्धा पुरेसे मिळत नाही. लोहारा येथे भीषण पाणी टंचाई आहे .त्यामुळे गावात पिण्याचे पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे.  ऐकीकडे महागाईने डोके वर काढले आहे आज तेलाचे भाव १८० ते २००  रुपये  किलो झाले आहेत परंतु  शेतमजुरांना   १०० रुपये मजुरी मिळत आहे. त्यांत आणखीन भर पाण्यांची २०० लिटर पाण्यासाठी ६० रुपये मोजावे लागते तर १५ लिटर   पिण्याच्यां पाण्यासाठी    १० रुपये मोजावे लागते.शेतामध्ये दिवसभर कष्ट केल्या त्या मजुरांला १०० रुपये मिळतात त्यामधून पाण्यावर   त्या शेतकरीमजुराचा खर्च दिवसाला ७० रुपये होतो ऊरवित ४० रुपयांमध्ये मजुर वर्गाणी काय करावे हे आता प्रशासनाने सागावे.  या ४०  रुपयांमध्ये घरांमध्ये खायाला कायकाय आणावे अशे अनेक प्रश्न लोहारा येथील मजुरंवर्गावर आहे. या उन्हाळ्यात पाणी भरण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला ऊन लागल्यास डॉक्टर साहेबांना देण्यासाठी  पैसे कोठून आणणार असा प्रश्न या शेतकरीमजुरांना पडत आहे. लोहारा गावांमध्ये मागील कित्येक महिन्यापासून पाणीटंचाई आहे तरी सुध्दा या गावाकडे कोणतेही अधिकारी लक्ष देण्यास तयार नाहीत. या गावांमध्ये पहिली ते दहावी पर्यंत शाळा आहे. गावांमध्ये पाणीटंचाई असल्यामुळे या लहान मुलांना आपल्या घरुन पिण्याचे पाणी  आणावे लागते.   प्रशासनाला जो पर्यंत पाण्यासाठी कोणाचा जीव जात नाही तोपर्यंत जाग येत नाही हे आपल्या अकोल्या जिल्हाची वास्तव तिथी आहे. लोहारा येथील मन नदिवरती धरण बांधलेले आहे. परंतु मन नदीवरील पुलाचे बांधकाम चालू असल्यामुळे मन नदीच्या पाञाचे पाणी सोडून दिले आहे. त्यामुळे लोहारा येथे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तरी या पाणीटंचाई कडे तहसीलदार साहेबांनी याकडे लक्ष देऊन लोहारा गावातील पाणी टंचाई दुर करावे असे लोहारा येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

Previous articleस्व.राजीव गांधी रुग्णालय येरवडा परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी मिळालेलं वरदान आहे
Next articleवाशी सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी गुलाब राठोड तर उपचेअरमनपदी मारोती खूपसे यांची निवड