Home Breaking News शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजारांची मदत द्या.

शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजारांची मदत द्या.

????युवा नेतृत्व दिनेश राठोड यांची मागणी

???? थेट बळीराजांच्या बांधावर,,,

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 22 जुलै 2023

संबंध नांदेड जिल्ह्यात
मागील दोन ते तिन दिवसापासून सुरू असणाऱ्या संततधार मुसळधार पावसामुळे, हिमायतनगर तालुक्यातील सर्व शेतकरी मायबापांच्या कष्टाने उभे राहिलेले कापूस, सोयाबीन, तुर, मुग, उडीद, हळद या पिकांचे भरपूर नुकसान झालेले आहे. यामुळे तालुक्यातील माझा बळीराजा चिंताग्रस्त आहे.
यामुळे माझी तालुका व जिल्हा प्रशासनांना
नम्र विनंती आहे की, या बाबींची तात्काळ चौकशी करुन, या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी. अशी आग्रही मागणी लोकनेते बाबुराव कोहळीकर यांचे खंदे समर्थक, सरसम जि. प. गटाचे भावी उमेदवार दिनेश राठोड यांनी केली आहे. कालपर्यंत हिमायतनगर तालुक्यात १०५ मिलीमीटर पाऊस पडला आहे.
यामध्ये तालुक्यातील अनेक गोरगरीब मायबापांच्या घराची देखील पडझड झालेली आहे, व गाई, गुरेढोरे यांना चा-याअभावी उपासमारीची वेळ आलेली आहे. यावर्षी उशिरा पेरणी करावी लागली. त्यामुळे पिके लहान असल्याने पाण्यामुळे मुळासहित वाहुन गेली आहेत. आम्हा शेतकऱ्यांना यावर्षी भविष्यकाळ अंधारमय झालेला दिसत आहे. मुलाबाळाचे शिक्षण, दवाखाना खर्च, संसाराचा गाडा कसा चालवायचा अशा मोठा प्रश्न आमच्यासमोर आ…वासुन उभा आहे. असेही त्यांनी सांगितले. मायबाप सरकारने तातडीची हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत देऊन, बळीराजाला जगवण्याचा प्रयत्न करावेत अशी मागणी शेतकऱ्यांच्या साक्षीने त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना केली आहे.

Previous articleढगफुटीमुळे तालुक्यातील शेतीचे मोठे नुकसान. ???? घरातही आले पाणीच पाणी
Next articleचिमुकल्यां रोपांनी बाळसं धरायला सुरू केले…. अन् नियतीने खेळ मांडला.