Home Breaking News ढगफुटीमुळे तालुक्यातील शेतीचे मोठे नुकसान. ???? घरातही आले पाणीच पाणी

ढगफुटीमुळे तालुक्यातील शेतीचे मोठे नुकसान. ???? घरातही आले पाणीच पाणी

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक – 21 जुलै 2023

जिल्ह्यात गुरुवारी रात्री प्रचंड अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. लहान लहान पिके सुद्धा पाण्याने वाहुन गेली आहेत. यावर्षीचा खरीप हंगामात सुरुवातीला उशीरा पाऊस पडल्याने, पेरणीला उशीर झाला होता.

त्यामुळे कापुस, सोयाबिन, मुग, उडीद, हळद, ज्वारी आदी पिके लहान असल्याने, पाण्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी साचलेले दिसत आहे. शेतीला तलावाचे स्वरुप आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या अतिवृष्टीमुळे मोठा फटका बसला आहे. आधिच कर्ज काढून कशीतरी पेरणी केली. त्यातच डबल पेरले बियाणे कसेबसे उगवले तर आता पाण्याने शेती वाहुन गेली आहे. या झालेल्या शेतीचे नुकसान भरपाई मिळावी. महसुल, कृषि विभागाने तातडीने पंचनामे करून, आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे.

???? संसार पडला उघड्यावर

ढगफुटीमुळे काही गावातील घरामध्ये अचानक पाणी आल्याने कुटुंबातील लोक घाबरलेल्या अवस्थेत आहेत. घरातील सामान पाण्यात भिजल्याने, सारा संसार उद्धवस्त झाला आहे.

Previous articleपुरात अडकलेल्या शेतकऱ्याचे रेस्क्यू ऑपरेशन
Next articleशेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजारांची मदत द्या.