Home Breaking News कै. योगेश मोगरे यांच्या खुन्यांना फाशी द्या.

कै. योगेश मोगरे यांच्या खुन्यांना फाशी द्या.

नशिक येथील मोर्चा मध्ये केली मागणी

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़
मो. नंबर – 8983319070

कै.योगेश सुरेश मोगरे या धनगर समाजाच्या तरुणाचा निर्घृण खून केल्या प्रकरणी त्याच्या परिवाराला न्याय मिळाला, आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी , या मागणीसाठी आज दिनांक 2 एप्रिल रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीय समाज पक्ष युवक आघाडीच्या वतीने पोलीस प्रशासनाने आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी जेणेकरून पुन्हा आशा घटना घडणार नाहीत व शासनाने मोगरे कुटुंबाना आर्थिक मदत मिळावी व रोहिणी कंपनीत त्यांच्या पत्नीला काम मिळावे अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने करण्यात आली यावेळी आमदार सीमाताई हिरे, भा ज प शहराध्यक्ष गिरीश पालवे, भा ज प भटके विमुक्त आघाडी नाशिक जिल्हाध्यक्ष बापू साहेब शिंदे,रा स प उत्तर महाराष्ट्र सचिव राजेंद्र पोथारे,शिवाजी दादा डेपले,नाशिक शहराध्यक्ष विलास पलंगे,नाशिक जिल्हाध्यक्ष अरुण आव्हाड,नाशिक जिल्हाध्यक्ष युवक आघाडी नवनाथ शिंदे, रावसाहेब कुवर (तात्या),हिन्दू एकता पक्ष राम सिंग बावरी,शरद बोडके, कैलास हाळनोर,कल्पना ताई पांडे, कांचन ताई खोडे, रवींद्र शिंदे,राजेंद्र जाधव, सोमनाथ मोहिते, सोमनाथ गायकवाड, रतन हिरे,बाबुराव हिंगे पाटील,शिवाजी ढगे, नवनीत वजीर, समाधान बागल,आबासाहेब टरफले, संदीप देवकाते, धनंजय वांगले, नितीन मोगरे, नाना मोगरे मोगरे कुटुंब ,नातेवाईक,मित्र परिवार,व हजारोंच्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Previous articleव्हाईस ऑफ मीडियाच्या डिजिटल विभाग नागपूर जिल्हाध्यक्षपदी देवनाथ गंडाटे यांची नियुक्ती
Next articleसैन्यदलातुन निवृत झालेल्या माजी सैनिकांने जिंकलं गाव