Home Breaking News हिमायतनगर शहरात सावता परिषदेतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी..

हिमायतनगर शहरात सावता परिषदेतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी..

अंगद सुरोशे हिमायतनगर प्रतिनिधी/-

महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज दि 11 एप्रिल रोजी असलेल्या जयंतीचे औचित्य साधून शहरातील सावता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शहरातील महात्मा फुले सभागृह येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करत ही जयंती साजरी केली त्याच बरोबर शहरातील विविध शासकीय, निमशासकीय कार्यलये, शाळा, महाविद्यालया सह आदी संस्थेमध्ये महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

हिमायतनगर शहरातील माळी युवक व समस्त समाज बांधवाच्या वतीने शिक्षणाचे जनक व ज्ञानाचे आध्यगुरु समजल्या जाणाऱ्या महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंती चे औचित्य साधून आज दिनांक 11 एप्रिल रोजी शहरातील महात्मा फुले सभागृहातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार आर्पण करुन त्यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी सावता परिषदेचे जिल्हा महासचिव शाम ढगे यांनी उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन करताना असे सांगितले की सत्यशोधक समाजाचे संस्थापक व महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे विचारवंत व समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांनी बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्र्य आणि जातिभेद पाहून सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला व महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची त्यांनी मुहूर्तमेढ रोवली अशा थोर समाज सुधारकाचे आजच्या तरुण पिढीने आचार विचार अंगिकारावे असे अनमोल मार्गदर्शन त्यांनी केले यावेळी सावता परिषदेचे जिल्हा सचिव श्याम ढगे ,संतोष सातव ता. अध्यक्ष, कृष्णा कटारे युवा ता. अध्यक्ष, अडबलवार सर, मारोती लुम्दे, राजदत्त सुर्यवंशी, बबलू काळे, सुभाष हेंद्रे, विशाल जाधव सावन रावते, रुषी लुटे,परमेश्वर जाधव, प्रदिप जाधव, सह आदी सामाजिक कार्यकर्ते व माळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

Previous articleगुढीपाडवा
Next articleमहादेवराव मिरगे यांची भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती