युवा सेना तालुका प्रमुख विशाल राठोड यांनी केला सत्कार...
हिमायतनगर /- कृष्णा राठोड
तालुक्यातील मौजे वाशी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक इतर निवडणुकी प्रमाणे न होता गावात एकोपा कायम ठेवत झाली येथील सोसायटीची निवड सर्वांच्या सहमतीने बिनविरोध करण्यात आली ह्या निवडी साठी हिमायतनगर येथील निवडणूक निर्णय अधिकारी ए.जी.पद्दमवाड व सहाय्यक निबंधक एल. टी.डावरे यांनी उपस्थित राहून येथील सोसायटीच्या चेअरमन पदी गुलाब राठोड व उपचेअरमनपदी मारोती खूपसे यांच्या सह इतर जणांच्या निवडी करून त्यांना पत्र दिले
त्यामुळे हिमायतनगर येथील युवा सेना तालुका प्रमुख विशाल राठोड,शिवसेना उप तालुका प्रमुख विलास वानखेडे, राम नरवाडे,उदय देशपांडे,अनिल भोरे,प्रकाश रामदिनवार सह आदी जणांनी सर्व नव निर्वाचित सेवा सहकारी सोसायटीच्या सदस्यांचे पुष्प हार घालून स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.