Home Breaking News श्रीक्षेत्र बोरगडी सज्याच्या तलाठ्याचा मनमानी कारभार…

श्रीक्षेत्र बोरगडी सज्याच्या तलाठ्याचा मनमानी कारभार…

????गारपीट ग्रस्त नुकसानीचे घरीच बसुन केले पंचनामे..समस्त गावकरी

ग्रामीण तालुका प्रतिनिधी/ माधव काईतवाड बोरगडीकर

हिमायतनगर -तालुक्यातील श्रीक्षेत्र बोरगडी येथील तलाठी यांचा गजब कारभार समोर आला.एप्रिल महिन्यात तालुक्यातील अनेक गावे झोडपुन काढले होते.या गारपीटीने शेतात उन्हाळी पिके काढणीस आले होते.शासनाने शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी प्रत्यक्ष पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.पण श्रीक्षेत्र बोरगडी सज्याच्या मुजोर तलाठी शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन न करता ज्यांचे नुकसान झालेच नाही अशा मोजक्याच लोकांना घरी बसुन कोतवाला च्या सांगण्यावरुन लाभ मिळवुन दिला.व ज्यांचे अतोनात नुकसान झाले त्या शेतकऱ्यांनी विचारणा केली असता उडवाउडवीचे उत्तरे दिली.असा गंभीर आरोप समस्त गावकऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली.यावेळी
अनुदान लाभापासून वंचित राहिलेले सर्व शेतकरी उपस्थित होते.

Previous articleशेकडो हेक्टर वरील पीके पाण्याखाली.
Next article*हिंदूधर्म रक्षक राजमाता अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त नियोजन बैठक संपन्न*