Home समाजकारण बाळापुर शहरात महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी..

बाळापुर शहरात महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी..

भुमिराजा शहर प्रतिनिधि बाळापुर

बाळापुर – शहरात राजपुत समाजाच्या वतिने महाराणा प्रताप जयंती निमीत्त मोटार रॅली काढण्यात आली.आणी या जयंती च्या निमीत्ताने ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप व वृक्षारोपण करण्यात आले होते.शहरात महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पुजन करून या मोटार सायकल रॅली जल्लोषात काढण्यात आली.या वेळी राजपुत समाजाचे युवक व युवती उपस्थित होत्या.शहरात महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पुजन राजपुत पुरा आणी शहरातील जयस्तंभ चौक येथे करण्यात आले.

Previous articleबाणाक्षरी
Next articleएक गाव एक स्मशानभूमी हीच महापुरुषांना खरी आदरांजली ठरेल — कांतरावजी देशमुख