Home Breaking News *हिंदूधर्म रक्षक राजमाता अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त नियोजन बैठक संपन्न*

*हिंदूधर्म रक्षक राजमाता अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त नियोजन बैठक संपन्न*

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़
मो. नंबर – 8983319070

हिंदूधर्म रक्षक राजमाता अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समितीमार्फत राजमाता अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी, *येत्या 13 ऑगस्ट वार रविवार रोजी करण्याचे नियोजन सुरू आहे त्यानिमित्त आज नियोजन बैठक पार पडली*. या हिंदू धर्मरक्षक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना शंकर महादेव प्रसन्न होते. या मातीने बारा ज्योतिर्लिंग यांचा जीर्णोद्धार चारधाम ठिकाणी मंदिरांचा जीर्णोद्धार, *पूर्वेला पुरी जगन्नाथ, पश्चिमेला सोमनाथ, दक्षिणेला रामेश्वर ते उत्तरेला काशी, श्रीनगर हरिद्वार बद्रीनाथ प्रयागराज, वाराणसी नासिक ओंकारेश्वर उज्जैन महाबळेश्वर श्रीशैलम इंदोर राजमाता अहिल्यादेवी ने भारतात असे शेकडो मंदिर या मातेने उभारले परंतु कुठेही स्वतःचे नाव देऊन गाजावाजा केला नाही* त्यावेळेस या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नसत्या तर आज आपल्यांना एकही धार्मिक ठिकाण बघायला मिळाले नसते यामध्येच ही त्रंबकेश्वर नगरी आहे.राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी त्र्यंबकेश्वर नगरी वसवण्यात खूप मोठा हातभार लावलेला आहे *त्यामध्ये चार ते पाच कुंड, कुशावर्तो निर्मिती, ब्रह्मगिरी मंदिराचा पुनर स्थापना अनेक मंदिरे घाट बारव, गणपती बारी तीर्थ, त्र्यंबक नगरीतील घाट त्रंबकराज मंदिराचे जीर्णोद्धार, नासिक ते त्र्यंबकेश्वर पर्यंत बारव तलाव अशा अनेक गोष्टींचे काम या हिंदू धर्म रक्षक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी केले* आणि आज तागायत कुठल्याही प्रकारे या मातेच्या कार्याचे गौरव या ठिकाणी करण्यात आले नाही त्याच पार्श्वभूमीवर पुण्यतिथीचे आचित्य साधून त्रंबक नगरी मधून धार्मिक दिंडी सोहळा टाळ मृदुंगाच्या गजरात, कुशावर्त ठिकाणी गंगा गोदावरी त्र्यंबकराज अहिल्या आरती महाआरती तसेच राजमातेच्या पुतळ्याचा अभिषेक करून ही पुण्यतिथी धार्मिक पद्धतीने साजरी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे . त्यासाठी सर्व जाती धर्मातील जनतेने साधू संत महात्मे पुरोहित महासंघ वारकरी मंडळी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे याप्रसंगी कुशावर्त या ठिकाणी आज नियोजन बैठक पार पडली यामध्ये त्र्यंबकेश्वर नगरचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, विकास बेलुकर महाराज,सामाजिक कार्यकर्ते देविदास भडांगे तांबे महाराज, समाजसेवक समाधान बागल श्याम गोसावी डॉ.कल्पेश शिंदे पांडुरंग भडांगे, हेमंत शिंदे सरदार घराण्याची वंशज भाऊसाहेब राजोळे, विनायक काळदाते, नानासाहेब दोंदे अनंता उपाध्ये, अण्णासाहेब सपनार वैभव रोकडे विजय चितळकर, भूषण जाधव, सचिन भडांगे, असे अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते

Previous articleश्रीक्षेत्र बोरगडी सज्याच्या तलाठ्याचा मनमानी कारभार…
Next articleनवे जिल्हाधिकारी पोहोचले बांधावर; शेतीच्या नुकसानीची केली पाहणी