Home Breaking News पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोहळयाला शिक्षण राज्यमंत्री बच्चुभाऊ कडु उपस्थित राहणार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोहळयाला शिक्षण राज्यमंत्री बच्चुभाऊ कडु उपस्थित राहणार

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा

31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळा नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे. या अंतर्गत शिवाजी गार्डन सीबीएस येथे अभिवादन व महाप्रसाद, शिवाजी गार्डन ते रामघाट मिरवणुक, संध्याकाळी गोदाआरती व अहिल्यादेवी आरती व सुप्रसिद्ध युवा व्याख्याते मा. गणेश शिंदे सर यांचे ” जीवन सुंदर आहे ‘ या विषयावर व्याख्यान असा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या करीता काल मुंबई मंत्रालय येथे जन्मोत्सव सोहळा आयोजकाच्या वतीने उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख दत्तू बोड़के, नाशिक जिल्हा चिटणीस समाधान बागल, नाशिक शहर प्रमुख श्याम गोसावी आदि सह नामदार बच्चुभाऊ कडु यांना निमंत्रण देण्यात आले. त्यांनी निमंत्रण स्वीकारून कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून येण्याचे मान्य केले आहे.

Previous articleरानडुकराने धडक दिल्याने युवक जखमी.
Next articleजगाला सुख शांतीचा महान संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या 2566 वी बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी.