राजेश जोशी (मुख्य प्रबंधक बॅंक ऑफ महाराष्ट्र लातूर) यांचे प्रतिपादन!
————
परभणी, (आनंद ढोणे पाटील)- पूर्णा तालूक्यातील जी गावे बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेशी दत्तक आहेत अशा गावातील शेतक-यांनी आपल्याकडील थकीत पिक कर्ज रक्कम भरणा करुन कर्ज खाते नुतनीकरण करावे आणि लगेच दुसऱ्या दिवशी दहा टक्के वाढीव रक्कमेत नवीन पिक कर्ज घ्यावे असे प्रतिपादन पूर्णा तालूक्यातील पांगरा लासीना येथील शेतकरी खातेदाराशी संवाद साधताना बॅंक ऑफ महाराष्ट्र लातूर विभागाचे मुख्य प्रबंधक राजेश जोशी यांनी दि ८ जून २०२२ रोजी सकाळी ८:३० वाजता केले. यावेळी,बॅंक ऑफ महाराष्ट्र पूर्णा शाखेचे प्रबंधक संजय कोलगणे, कृषी अधिकारी विशाल सुर्यवंशी, सरपंच उत्तमराव ढोणे,शेतकरी गोविंदराव ढोणे, तुकाराम ढोणे, तातेराव ढोणे, केशवराव ढोणे, विष्णूपंत ढोणे, साईनाथ ढोणे,जय हनुमान ट्रेडिंग कंपनीचे रंगनाथराव शिंदे, काशिनाथ ढोणे, माधव पावडे, बबन ढोणे, दिलीप ढोणे, ज्ञानदेव ढोणे, विवेकानंद ढोणे सह आदी खातेदार शेतकरी उपस्थित होते. या प्रसंगी,राजेश जोशी म्हणाले की, शेतक-यांनी आपल्याकडील थकीत पिक कर्ज सतत तीन वर्षे नूतनीकरण करत राहिले तर त्या शेतकऱ्यांना दर वर्षी मुळ रक्कमेत दहा टक्के वाढ देण्यात येईल, तसेच पाईप लाईन कर्ज, कृषी पुरक उद्योगाकरीता,शेतक-याच्या मुला मुलींच्या उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज देण्यात येईल. त्याकरीता शेतक-यांनी आपले पिक कर्ज नूतनीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे.शेतक-यांनी जर नेहमी पिक कर्ज भरणा करुन खाते नुतनीकरण करुन बॅंकेला सहकार्य केले तर बॅंक देखील शेतक-यांची पत वाढवते.
या वेळी उपस्थित शेतक-यांनी आपापल्या तक्रारी मांडल्या असता जोशी सर आणि शाखा प्रबंधक संजय कोलगणे यांनी समस्येचे निराकरण केले. नवीन पीक कर्जासाठी अर्ज करण्याचेही सांगितले.